चार शेतक:यांची आत्महत्या

By admin | Published: August 21, 2014 01:48 AM2014-08-21T01:48:35+5:302014-08-21T01:48:35+5:30

खसगी सावकारांचे कर्ज कसे फेडावे या विंवचनेतून मंगळवारी नांदेड जिलतील तीन, तर लातूर जिलतील एका शेतक:याने आपली जीवन यात्र संपविली आह़े

Four farmers: Suicides | चार शेतक:यांची आत्महत्या

चार शेतक:यांची आत्महत्या

Next
नांदेड/देवणी (जि़ लातूर) : मराठवाडय़ात दुष्काळाचे ढग अधिकच गडद झाले असून, वाया गेलेल्या पेरण्या आणि बँकांचे व खसगी सावकारांचे कर्ज कसे फेडावे या विंवचनेतून मंगळवारी नांदेड जिलतील तीन, तर लातूर जिलतील एका शेतक:याने आपली जीवन यात्र संपविली आह़े  
नांदेड जिलतील हरडफ येथील रामराव चंद्रभान कदम (5क्) यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. अतिवृष्टीमध्ये हरडफ गाव 9क् टक्के बाधित झाले होते. मात्र, शासनाची मदत गावाला मिळाली नाही. रब्बीच्यावेळी गारपीट झाली. सावकारी कर्ज काढून सोयाबिन लावले. पावसाने उघडीप घेतल्याने दुबार पेरणी करुनही फायदा झाला नाही. थकीत व बँकेचे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत त्यांनी विष घेतले. 
तिबार पेरणी करुनही पीक हाती न आल्याने तसेच कजर्बाजारीपणा कंटाळून माहूर तालुक्यातील मौजे महादापूर येथील विलास आडे (45) यांनी मंगळवारी विषारी औषध पिवून मृत्यूला जवळ केले. त्यांच्यावर बँकेचे 7क् हजाराचे कजर्, खाजगी कर्ज व मुलीचे लगA कसे करावे? या विवंचनेत  ते सापडले होत़े  
तर नांदेड जिलतीलच मुदखेड तालुक्यातील मौजे दुधनवाडी येथील परमेश्वर रामजी नाईकवाडे (33) यांनीही नापिकी व दुबार पेरणी कर्जाचे डोंगर अस झाल्याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली.  
डोळ्यांदेखत उभे पीक वाळत असल्याने तसेच कर्जाला कंटाळून लातूरच्या देवणी तालुक्यातील कमालवाडी येथील विजयकुमार रावसाहेब भिंगे (4क्)  यांनी मंगळवारी सकाळी आत्महत्या केली.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Four farmers: Suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.