लोटसविरोधात एफआयआर

By admin | Published: July 22, 2014 02:03 AM2014-07-22T02:03:55+5:302014-07-22T02:03:55+5:30

आगीत खाक झालेल्या अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्क इमारतीत अग्निप्रतिबंधक कायद्याचे नव्हे, तर पालिका नियमांचेही उल्लंघन झाले आह़े

FIR against Lotus | लोटसविरोधात एफआयआर

लोटसविरोधात एफआयआर

Next
मुंबई : आगीत खाक झालेल्या अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्क इमारतीत अग्निप्रतिबंधक कायद्याचे नव्हे, तर पालिका नियमांचेही उल्लंघन झाले आह़े तसेच मूळ आराखडय़ापेक्षा अनेक बदल या इमारतीमध्ये करण्यात आल्याचे प्रथमदर्शी आढळून आले आह़े त्यामुळे पालिका प्रशासनामार्फत लोटस पार्कवर उद्या एफआयआर दाखल करण्यात येणार आह़े 
शुक्रवारी 22 मजल्यांच्या या इमारतीला आग लागून एका जवानाचा मृत्यू झाला़ या प्रकरणाच्या चौकशीत 21व्या मजल्यावरील सव्र्ह रूममध्ये आग लागण्याचे प्रथमदर्शी दिसून येत आह़े मात्र या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याने त्याची झळ अग्निशमन दलाच्या जवानांना बसली़ याची गंभीर दखल घेऊन पालिकेने या इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आह़े तत्पूर्वी अग्निशमन दलाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आह़े तसेच आगीमुळे ही इमारत आता वापरण्याजोगी नसल्यामुळे येथील व्यवहारही ठप्प करण्यात आले आहेत़ एवढय़ावरच ही कारवाई थांबणार नसून या इमारतीच्या मालक अथवा सोसायटीविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 
इमारतीचा 13वा मजला गायब
च्13 आकडा म्हणजे खतरा असे अनेक जण मानतात़ या तारखेला शुभ काम न करण्याचा काहींचा आग्रह असतो़ या इमारतीमध्ये चक्क 13वा मजलाच नव्हता़ 12व्यानंतर त्यावरील मजल्याला 14 आकडा देण्यात आल्याने पालिका अधिकारीही चक्रावले आहेत़ 
इवलेकर कुटुंबीयांचे पुनर्वसन
या दुर्घटनेत शहीद झालेल्या नितीन इवलेकर यांची पत्नी शुभांगी आणि त्यांच्या दोन मुलांसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आह़े यापैकी पनवेल येथील एका संस्थेने दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचचला, तर पालिकेने शुभांगीला बोरीवलीच्या भगवती अथवा जोगेश्वरीच्या पालिका रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरीची ऑफर दिली आह़े
 
चौकशी अहवाल 
दोन दिवसांत
या आगीच्या दुर्घटनेची चौकशी सुरू असून, याचा अहवाल दोन दिवसांमध्ये पालिका प्रशासनाला सादर होणार आह़े मात्र या इमारतीमध्ये अनेक बदल तसेच अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याने या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात आली आह़े अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्यामार्फत ही चौकशी होणार आह़े
 
सरकारी काम आणि सहा महिने थांब़ यास अत्यावश्यक सेवा असलेले अग्निशमन दलही अपवाद नाही़ त्यामुळे गरज असूनही 9क् मीटर उंच शिडीचा प्रस्ताव दोन वर्षे धूळखात होता़ अखेर लोटस पार्कच्या दुर्घटनेत एका जवानाचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेला जाग आली आह़े त्यानुसार या शिडीच्या खरेदीला वेग आला असून, लवकरच फिनलँडला जाऊन त्याची चाचपणी होणार आह़े विशेष म्हणजे देशातील ही पहिली उंच शिडी ठरणार असून, अग्निशमन दलाची मजल 3क्व्या मजल्यार्पयत पोहोचणार आह़े
मुंबईत उत्तुंग इमारतींची स्पर्धा सुरू असल्याने त्यांच्या उंचीपुढे अग्निशमन यंत्रणा तोकडी पडू लागली आह़े आजच्या घडीला अग्निशमन दलाच्या ताफ्यात 7क् मीटर उंचीची शिडी आह़े परंतु ही शिडी केवळ 2क्व्या मजल्यार्पयत पोहोचू शकत़े याहून उंच शिडीची उणीव लोटस पार्कच्या आगीदरम्यान प्रकर्षाने जाणवली़ या इमारतीच्या 22व्या मजल्यार्पयत शिडी पोहोचू शकली नाही़ त्यामुळे 9क् मीटर शिडीच्या खरेदीचा प्रस्ताव अखेर दोन वर्षानंतर स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणण्यात आला आह़े 
 
फिनलँडला जाऊन प्रशिक्षण 
ही शिडी फिनलँडमधून खरेदी केली, तरी ती चालवायची कशी? याचे ज्ञान येथील कर्मचा:यांना नाही़ त्यामुळे अग्निशमन दलातील अभियंत्यांना फिनलँडला पाठविण्यात येणार आह़े 19 कोटींची ही शिडी खरेदी करण्यापूर्वी अग्निशमन दलाचे प्रमुख आणि अभियंते फिनलँडला जाऊन या शिडीची तपासणी करणार आहेत़ 
 
या शिडीचे 
वैशिष्टय़
च्9क् मीटरच्या या शिडीच्या टोकाला प्लॅटफॉर्म बांधलेला असेल, ज्यामुळे त्यातून आगीवर पाण्याचा फवारा मारणो शक्य होणार आह़े़ 
च्पाचशे किलो वजन आणि एकावेळी चार ते पाच लोकांची सुटका करू शकणारी ही शिडी अग्निशमन दलाची ताकद वाढविणार आह़े

 

Web Title: FIR against Lotus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.