लोकशाही मूल्यांसाठी दिला लढा

By Admin | Published: August 22, 2014 11:56 PM2014-08-22T23:56:50+5:302014-08-22T23:56:50+5:30

कन्नड साहित्यात बहुमोल योगदान असलेले ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे शुक्रवारी निधन झाले.

The fight given for democracy values | लोकशाही मूल्यांसाठी दिला लढा

लोकशाही मूल्यांसाठी दिला लढा

googlenewsNext
पुणो : आपल्या प्रतिभासंपन्न साहित्यकृतीने जीवनातील वास्तवाचे दर्शन घडविणारे आणि कन्नड साहित्यात बहुमोल योगदान असलेले ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना वाहिलेली शब्दरूपी श्रद्धांजली. 
 
मी अनंतमूर्ती यांच्याबरोबर कधी काम केले नाही. त्या अर्थाने त्यांच्याशी संबंध आला नव्हता; मात्र मी त्यांना अनेकदा भेटलो आहे. ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर वाटावा असे ते होते. ते प्रतिभाशाली लेखक तर होतेच; पण आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला एक महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे होता, तो म्हणजे लोकशाही मूल्यांसाठी कणखरपणो, ताठपणो कितीही विरोध असताना उभे राहणो. त्यांच्या या गुणामुळे आपल्यासारख्या माणसांना सतत स्फूर्ती मिळत राहिली. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने एक पर्व संपले, अशी भावना मनात येत आहे. त्यांच्यामुळे जे काही मिळाले ते विसरता कामा नये, असे मनापासून वाटते. ज्या ज्या वेळी लोकशाही मूल्यांसाठी उभे राहायची गरज भासेल, तेव्हा अनंतमूर्तीची उणीव भासेलच, पण ते आपल्याला प्रेरणाही देत राहतील.
- अमोल पालेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते
 
सुरुवातीला आमचा परिचय फक्त पत्रव्यवहारापुरता होता. नंतर मात्र गाठीभेटी होत गेल्या. आमच्या घरीही ते एक-दोनदा येऊन गेले आहेत. त्यांच्या तीन कादंब:या मराठीत अनुवादित झाल्या. त्यापैकी दोन कादंब:यांचा आणि एका कथासंग्रहाचा अनुवाद मला करायला मिळाला. माङया अनुवादाबद्दल ते समाधानी होते आणि त्यांच्यासारख्या मोठय़ा लेखकाचे साहित्य मला अनुवादित करता आले, याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
अनंतमूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांच्यावर लोहियांचा प्रभाव होता आणि त्यांनी तो कधीही नाकारला नाही. तो प्रभाव त्यांच्या लेखनातूनही व्यक्त व्हायचा. ते स्वत: अतिशय कर्मठ वातावरणात वाढले होते. त्यांच्या ‘संस्कार’, ‘घटश्रद्ध’मध्ये जे वातावरण दिसते, ते त्यांनी अगदी जवळून अनुभवले होते. मात्र, त्यांनी ते वातावरण वापरले ते आपले आधुनिक विचार मांडण्यासाठी. गिरीश कार्नाड, गिरीश कासारवल्ली यांच्यासारख्या दिग्दर्शकांना त्यांच्या साहित्याने साद घातली आणि या लेखक-दिग्दर्शकांच्या प्रतिभेतून उत्तम चित्रपट निर्माण झाले. जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
- उमा कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका

 

Web Title: The fight given for democracy values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.