३६ वर्षातील सर्वात मोठे रमजानचे उपवास

By admin | Published: June 7, 2016 07:57 PM2016-06-07T19:57:10+5:302016-06-07T20:04:38+5:30

मुस्लिम बांधवाना १५ तासापेक्षा अधिक काळ उपवास करावा लागणार आहे. त्यांना मागील ३६ वर्षात असे पहिल्यांदाच यास सामोर जाव लागत आहे.

The fastest Ramadan festival of 36 years | ३६ वर्षातील सर्वात मोठे रमजानचे उपवास

३६ वर्षातील सर्वात मोठे रमजानचे उपवास

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ७ : आजपासून रमजानच्या उपवासास सुरवात झाली आहे. दिवसभर कडकडीत उपवास करून पाण्याचा एक घोटही न घेता उपवास म्हणजे रोजा संपल्यानंतर रात्री फराळ करायचा, जेवण घ्यायचे. असा मुस्लिम बांधवांचा दिनक्रम. पण मागील ३६ वर्षातील जो उपवासासचा कालखंड होता तो यावर्षी वाढला आहे. यावर्षी आपल्या मुस्लिम बांधवाना १५ तासापेक्षा अधिक काळ उपवास करावा लागणार आहे. त्यांना मागील ३६ वर्षात असे पहिल्यांदाच यास सामोर जाव लागत आहे. कारण यावेळी त्यांच्या रमज़ानचा पवित्र महिना हा उष्ण आणि दमट महिन्यात आला आहे. यावर्षी रमजानचे उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवाना सरासरी सकाळी ३:३० ते रात्री ७ पर्यंत उपवास करावा लागणार आहे. 
 
रमजानचे उपवास करण्यासाठी विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते, २०११ आणि २०१३ मध्ये मी ज्यावेळी मक्‍कामध्ये होतो त्यावेळी ४८  अंशसेल्सिय तापमान होते आणि त्यावेळी तिथे १० लाखापेक्षा जास्त मुस्लिम बांधवानी रमजानचे उपवास केले होते. असे मत लखनऊ विद्यापिठातिल माजी प्राध्यापक इक्बाल अहमद यांनी सांगीतले. 
 
इस्लाम धर्मातील सण ज्या महिन्यात येतात त्यांच्या कालगणनेस ' हिजरी सन ' असे म्हणतात. त्यांच्या नव्या दिवसाला सूर्यास्तापासून प्रारंभ होतो. ते चांद्रवर्ष मानीत असल्यामुळे त्यांचे महिने दर वर्षी वेग वेगळ्या ऋतूत येतात. इस्लाम महिन्यांची नावे अशी - मोहरम, सफ्फर, रबिउल अव्वल, रबिउल आखर, जमा दिलअव्वल, जमी दिलआखर, रज्जब , साबान, रमजान, सव्वाल, जिल्काद, जिल्हज यापैंकी सातवा , अकरावा , आणि बारावा हे तीन महिने विशेष पवित्र मानले जातात. ' ईद - ए - मिलाद - हा सण विशेष महत्वाचा मनाला जातो. मुहंमद पैगंबरांचा जन्म या दिवशी झाला आणि मृत्यूही त्याच दिवशी झाला. त्यामुळे या सणाला दुहेरी महत्व प्राप्त झालेले आहें
 
रमजान हा अरबी कॅलेंडरमधील नववा महिना आहे. कुराणावर जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आचरण करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी उपवास ठेवले जातात. कुराणाची शिकवण ही मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकते. आपल्या. ईदच्या दिवशी सगळे एकमेकांना भेटून ' ईद मुबारक' असे म्हणून ईदच्या शुभेच्छा देतात. मुस्लिम लोक मशिदीत जमून नमाज पढतात आणि कुराणाचे श्रवण पठण करतात.

Web Title: The fastest Ramadan festival of 36 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.