प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:28 PM2018-09-27T20:28:10+5:302018-09-27T20:44:23+5:30

Famous writer Kavita Mahajan dies in Pune | प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात निधन

Next

पुणे : ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. 
कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना गेल्या महिन्याभरापासून फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. 

कविता महाजन या महिनाभरापूर्वीच पुण्याला मुलीकडे गेल्या होत्या. मुलीला ताप येत असल्याने त्यांनी तिला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, त्यांनाही ताप आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या मुली होत. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती.




त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (२००८) मध्ये मिळाला होता. याचबरोबर कवयित्री बहिणाबाई पुरस्कार (२००८), साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला, २०११), मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 
कविता महाजन यांचा कुहू हा लेखसंग्रह लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. तसेच म्रृगजळीचा  हा काव्यसंग्रह, ब्र आणि भिन्न या कादंबऱ्याही गाजल्या होत्या. उर्दू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.

Web Title: Famous writer Kavita Mahajan dies in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.