आत्मक्लेश यात्रा मंत्रालयाच्या दारात

By admin | Published: May 30, 2017 04:53 AM2017-05-30T04:53:23+5:302017-05-30T04:53:33+5:30

केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची

At the doorstep of Ministry of External Affairs | आत्मक्लेश यात्रा मंत्रालयाच्या दारात

आत्मक्लेश यात्रा मंत्रालयाच्या दारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सोमवारी मंत्रालयावर धडकण्यासाठी दक्षिण मुंबईत दाखल झाली. सरकारने शेतकऱ्यांना अडवल्यास ‘अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ऊन सोसत नसल्याने ते यात्रेत सहभागी न झाल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला.
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असे आव्हान शेट्टी यांनी सरकारला दिले. सात-बारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी त्यांच्या मागण्या आहेत. पुण्याच्या फुले वाड्यापासून १९० किलोमीटरचा प्रवास यात्रेने केला आहे. राजू शेट्टी यांच्या सौरभ या मुलाला आज उष्णतेमुळे चक्कर आली. आधी सरकारचा पाठिंबा काढून शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढावी, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

१ जूनला संप होणारच

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तरच इतर मागण्यांबाबत चर्चेसाठी मुंबईत जाऊ, अन्यथा नाही. पुणतांबा येथे येऊन मुख्यमंत्र्यांनी संपकरी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत किसान क्रांती समिती व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावला. त्यांनी १ जूनपासून संपाची तयारी चालवली आहे.

संघर्ष यात्रेने प्रश्न सुटणार नाहीत
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. केवळ संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात पत्रकारांना सांगितले.

मुंबई हादरवू
मोदी सध्या बाहुबली चित्रपटातील ‘बल्लाळ देव’ बनले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर आम्ही ‘एनडीए’त आलो. मात्र, आमचा भ्रमनिरास झाला. आंदोलनात २५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. आम्ही मुंबई हादरवून सोडू.
- खा. राजू शेट्टी

राज्यपालांनी दिली वेळ
राज्यपाल विद्यासागर राव यांनी शेट्टी यांना मंगळवारी सायंकाळी
५ वाजता भेटीची वेळ दिली आहे.

Web Title: At the doorstep of Ministry of External Affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.