पितापुत्रचा वर्षभर चिमुरडीवर अत्याचार

By admin | Published: November 29, 2014 01:42 AM2014-11-29T01:42:52+5:302014-11-29T01:42:52+5:30

शेजारी राहणा:या पिता-पुत्रने मिळून एका 1क् वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भांडुपमध्ये उघडकीस आला.

Childhood year old girl's atrocity | पितापुत्रचा वर्षभर चिमुरडीवर अत्याचार

पितापुत्रचा वर्षभर चिमुरडीवर अत्याचार

Next
सुरू होते विकृत चाळे : भांडुप पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा 
मुंबई : शेजारी राहणा:या पिता-पुत्रने मिळून एका 1क् वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भांडुपमध्ये उघडकीस आला. वर्षभरापासून या दोघांकडून अत्याचार सुरू होते, अशी माहिती चिमुरडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम पिता-पुत्रला लागलीच अटक केली.
तेजस नार्वेकर (25) आणि चंद्रकांत नार्वेकर (55) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तेजस खासगी कंपनीत नोकरी करतो, तर त्याचा बाप चंद्रकांत रिक्षाचालक आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुरडी आपल्या आईवडील आणि भावंडांसह गेल्या सहा वर्षापासून आरोपींच्या घरात भाडय़ाने राहत होती. दोघांच्याही खोल्या शेजारी-शेजारी होत्या. वडील दारूच्या आहारी गेलेले आणि बेरोजगार. त्यामुळे तीन मुलांच्या संगोपनाचा भार आईवर पडला. आईने कल्याणमध्ये घरकाम स्वीकारले. कामाच्या निमित्ताने आई, तर शाळेच्या निमित्ताने भावंडे घराबाहेर असताना ही चिमुरडी वासनांध आरोपींच्या हाती सापडे. मुलीने दिलेल्या जबाबानुसार गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये तेजसने चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले. मोबाइलमधील अश्लील फोटो, चित्रफिती दाखवल्या. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू केले.  हळूहळू चंद्रकांतनेही या मुलीला घरी बोलावून चाळे सुरू केले. 
काल रात्री 11च्या सुमारास चिमुरडीचे पोट व नाजूक भाग दुखू लागला. त्यामुळे आईने खोदून खोदून केलेल्या चौकशीत घरमालक व त्याच्या मुलाने आपल्या मुलीवर केलेल्या अत्याचारांना वाचा फुटली. आईने हा प्रकार जवळच्या व विश्वासू नातेवाइकाला सांगून तडक पोलीस ठाणो गाठले. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून तेजस, चंद्रकांतविरोधात बलात्कार, धमक्या, बाललैंगिक अत्याचारविरोधी अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंद झाल्यानंतर काही मिनिटांच्या आत नार्वेकर पिता-पुत्रला अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत धाडले.  मेडिकलच्या नावावर पोलिसांनी पहाटे 6र्पयत बसवून ठेवले. खूप वेळानंतर पोलिसांनी साडेआठला या, असे सांगून आम्हाला घरी धाडले. साडेआठला वेळेत पोलीस ठाण्यात आलो. मात्र मुलीला दुपारी 1 वाजता रुग्णालयात नेले. तिथेही खोळंबा झाल्याने मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले. 
 
हल्लीच घडलेल्या घटना
24 ऑक्टोबर :  मोठ्या भावासोबत दुकानाबहेर फटाके वाजवत असलेल्या 9 वर्षीय चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या गुन्हयातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले.
25 ऑक्टोबर :  गोवंडीच्या बैगनवाडी, शिवाजीनगर परिसरात घराबाहेर खेळणा:या 11 वर्षीय चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. याप्रकरणी  शेजारी कासीम खान उर्फ कासीम टेलर याला शिवाजीनगर पोलिसांनी 25 ऑक्टोबर अटक केली होती.
26 ऑक्टोबर : घाटकोपरच्या अमृतनगर परिसरात घराकामासाठी आणलेल्या 11 वर्षीय मुलीवर 53 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचे उघड झाले. पार्कसाईट पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 
 
आयटी अॅक्ट का नाही लावला?
पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये आरोपी तेजसने चिमुरडीला मोबाइलमधील अश्लील फोटो दाखविल्याचा उल्लेख आहे. मात्र असे असूनही पोलिसांनी तेजसविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदविलेला नाही. याबाबत वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता, ही कृती माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
 
आरोपींकडून सुटली, पोलिसांनी मात्र छळले
लैंगिक अत्याचाराने मनावर आघात झालेली ही चिमुरडी आरोपींच्या तावडीतून सुटली असली तरी भांडुप पोलिसांच्या भोंगळ कारभाराने तिचा पोलीस ठाण्यातही छळच झाला. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गुन्हा नोंद झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळर्पयत या मुलीवर वैद्यकीय चाचण्या झाल्या नव्हत्या. एवढय़ा वेळात फक्त दोन तास या चिमुरडीला घरी सोडण्यात आले. एवढे कमी की काय म्हणून पोलीस ठाण्यात जो अधिकारी, कर्मचारी येई तो या चिमुरडीला, तिच्या पालकांना काय केस आहे, हा प्रश्न विचारे. बलात्काराचा गुन्हा कळल्यावर आणखी चवीने चौकशी करे. 
 
तक्रारदार चिमुरडी व आरोपींवर नागपाडय़ातील पोलीस रुग्णालयात शुक्रवारी वैद्यकीय चाचण्या पार पडल्या. त्यांचे अहवाल अद्याप हाती आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तेजसचा मोबाइल हस्तगत करून पोलिसांनी तपासणी सुरू केल्याची माहिती मिळते. 
 
खच्चीकरण करू नये
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्यास बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो़ त्यामुळे  या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अथवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिका:याने करणो आवश्यक आह़े पीडित मुलीचा जबाब नोंदवताना तिला विश्वासात घेतले पाहिज़े तिचे मानसिक खच्चीकरण होईल, अशी वागणूक पोलिसांनी पीडितेला देऊ नय़े
- अॅड़ प्रकाश साळशिंगीकर
 

 

Web Title: Childhood year old girl's atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.