छगन भुजबळ आता ईडीच्या रडारवर

By admin | Published: June 22, 2015 02:40 PM2015-06-22T14:40:19+5:302015-06-22T14:41:49+5:30

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळांच्या मुंबई व परिसरातील घर - कार्यालयांवर छापे टाकले आहे.

Chhagan Bhujbal now on the ED's radar | छगन भुजबळ आता ईडीच्या रडारवर

छगन भुजबळ आता ईडीच्या रडारवर

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - महाराष्ट्र सदन व कलिनातील सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामातील भ्रष्टाचारामुळे छगन भुजबळ आणखी अडचणीत सापडले असून सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळांच्या  मुंबई व परिसरातील घर - कार्यालयांवर छापे टाकले आहे. दिवसभर हे छापा सत्र सुरुच असेल अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. 

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन व कलिनातील सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामातील गैरव्यवहारात सरकाला ८६८. ६६ कोटी रुपयांचा फटका बसला असे सांगत ईडीने काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांविरोधात ईसीआयआर दाखल केला होता. आता ईडीनेही भुजबळांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली असून सोमवारी ईडीने छापे टाकलेे. आम्ही या प्रकरणाशी संबंधीत असलेल्यांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले अशी माहिती ईडीच्या अधिका-याने दिली. मात्र नेमक्या कोणाकोणाच्या घरावर छापे टाकले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.  यापूर्वी पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) भुजबळांच्या मुंबईतील सात, ठाण्यातील दोन, नाशिकमधील पाच तर पुण्यातील दोन मालमत्तांवर छापे घातले होते. ईडीच्या कारवाईने भुजबळांभोवतीचा कायद्याचा फास आणखी आवळल्याचे दिसते. 

Web Title: Chhagan Bhujbal now on the ED's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.