औरंगाबादमध्ये बिबट्याची तीनही पिल्ले दगावली

By Admin | Published: March 9, 2016 01:05 PM2016-03-09T13:05:45+5:302016-03-09T20:30:29+5:30

औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील बिबट्याच्या तिन्ही नवजात पिलांचा मृ्त्यू झाला आहे.

In Aurangabad, the three piglets of the leopard stabbed | औरंगाबादमध्ये बिबट्याची तीनही पिल्ले दगावली

औरंगाबादमध्ये बिबट्याची तीनही पिल्ले दगावली

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ९ - औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील बिबट्याच्या दोन नवजात पिलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला तर, प्रकृती चिंताजनक असलेल्या तिस-या पिल्लाचा बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. साडेचार वाजता त्या पिलाला फिट आली होती. हेमलकसा येथून २० दिवसांपूर्वी आणलेल्या रेणू नावाच्या मादी बिबट्याने सोमवारी रात्री तीन पिलांना जन्म दिला होता. मात्र त्यापैकी दोघांचा आज सकाळी मृत्यू झाला.
आश्चर्याची बाब म्हणजे रेणू गर्भवती आहे हे महापालिकेच्या डॉक्टरांना माहितच नव्हते. ती जेवण करीत नसल्याने तिच्यावर वेगवेगळे उपचार करण्यात येत होते. या उपचारांमुळे वेळेपूर्वीच तिची प्रसूती झाल्याचे समोर आले. 

 

Web Title: In Aurangabad, the three piglets of the leopard stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.