सरबत हा शब्द कुठून आला आणि हिंदीत त्याला काय म्हणतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:33 PM2024-04-22T16:33:22+5:302024-04-22T16:39:02+5:30

सरबत शब्द कोणत्या भाषेतील आहे आणि त्याला हिंदीत काय म्हणतात? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

Where does the word sarbat come from and what is it called in Hindi? | सरबत हा शब्द कुठून आला आणि हिंदीत त्याला काय म्हणतात?

सरबत हा शब्द कुठून आला आणि हिंदीत त्याला काय म्हणतात?

उन्हाळा सुरू झाला की, घराघरांमध्ये सरबत प्यायला सुरूवात होते. वाढत्या तापमानात थंड सरबताने शरीराला खूप आराम मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे शरबत लोकांच्या घरात तयार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, सरबत शब्द कोणत्या भाषेतील आहे आणि त्याला हिंदीत काय म्हणतात? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, सरबत हा शब्द पारशी भाषेतून आला आहे. हा शब्द तुर्कीच्या शेर्बतमधून आला आहे. याचा अर्थ होतो की, पिण्यालायक गोष्ट. पण काही लोक याला अरबी भाषेतील शरिबातून आल्याचं म्हटलं जातं. ज्याचा अर्थ पिणं होतं. याशिवाय प्राचीन भारतात सरबतला ‘पनाका’ म्हटलं जातं होतं. आपले शास्‍त्र, पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. तेव्हा पनाका फळांच्या रसापासून तयार केलं जात होतं. अर्थशास्‍त्रात सरबताला ‘मधुपराका’ नावाने ओळखलं जातं. हेच सरबताचं हिंदीतील नाव मानलं जातं.

‘मधुपराका’ कसं बनवायचे

त्या काळात उन्हाळ्यात घरांमध्ये पाहुण्याचं स्वागत ‘मधुपराका’ ने केलं जात होतं. हे मध, दही आणि तूपापासून बनवलं जात होतं. 5 महिने प्रेग्‍नेंट महिलेलाही दिलं जात होतं. हे फार हेल्दी असतं. एका माहितीनुसार, पहिल्या लग्नानंतर जेव्हा नवरी किंवा नवरदेव आपल्या सासरी जात होते तेव्हा त्यांना मधुपराका पिण्यास देत होते.

सुगंधी सबरत

एका माहितीनुसार, मुघल काळा भारतात सरबताचे अनेक रूप होते. सम्राटांसाठी सुगंधी सरबत तयार केलं जातं होतं. असंही म्हटलं जातं की, जे गुलाबी सरबत आज आपण पिणं पसंत करतो. त्याची सुरूवात जहांगीरची महाराणी नूरजहांने केली होती. रोज फालूदा मिक्स करून ते दिलं जात होतं. पारशी लोक याला शिकंजाबिन म्हणतात. जे पाणी आणि बर्फ टाकून तयार केलं जातं. 

Web Title: Where does the word sarbat come from and what is it called in Hindi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.