वॉट्स अ‍ॅपवर नो उल्लू बनाविंग, मेसेज वाचल्याचे कळणार

By admin | Published: November 6, 2014 01:07 PM2014-11-06T13:07:24+5:302014-11-06T13:32:53+5:30

वॉट्स अ‍ॅपवर आलेला मेसेज वाचलाच नाही असं यापुढे सांगता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने मेसेज पाठवल्यास आपण तो वाचला की नाही हे त्या व्यक्तीला समजणार आहे.

On the Whatsapp app, there will be no noise, message will be read | वॉट्स अ‍ॅपवर नो उल्लू बनाविंग, मेसेज वाचल्याचे कळणार

वॉट्स अ‍ॅपवर नो उल्लू बनाविंग, मेसेज वाचल्याचे कळणार

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - वॉट्स अ‍ॅपवर आलेला मेसेज वाचलाच नाही असं यापुढे सांगता येणार नाही. वॉट्स अॅपमधील नवीन फिचरनुसार एखाद्या व्यक्तीने मेसेज पाठवल्यास आपण तो वाचला की नाही हे त्या व्यक्तीला समजणार आहे. काही वॉट्स अ‍ॅप युजर्सच्या मोबाईलवर ही सुविधा सुरुदेखील झाली आहे. 
अवघ्या काही वर्षांमध्येच लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपचे बिरुद मिरवणा-या वॉट्स अ‍ॅपने आता नवनवीन फिचर्स द्यायला सुरुवात केली आहे. यापूर्वी वॉट्स अ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीने मेसेज केला व तो मेसेज संबंधीत व्यक्तीला मिळाला हे दर्शवण्यासाठी राखाडी रंगातील दोन टीक मार्क यायचे. मात्र तो मेसेज संबंधीत व्यक्तीने वाचला की नाही हे समजू शकत नव्हते. त्यामुळे अनेकदा गोंधळ उडायचा. यावर वॉट्स अ‍ॅपने तोडगा काढला आहे. आता वॉट्स अ‍ॅपवर मेसेज रिड केल्यास राखाडी रंगातील दोन टीक मार्क निळ्या रंगात बदलणार आहे. तसेच पाठवलेल्या मेसेजवर दीर्घ काळ प्रेस करुन ठेवल्यास मेसेज इन्फोद्वारेही मेसेज रिड झाल्याची माहिती मिळेल. अद्याप ही सुविधा सर्व युजर्सना मिळालेली नाही. लवकरच वॉट्स अ‍ॅपकडून अपडेट दिली जाणार असल्याचे समजते. भारतात वॉट्स अ‍ॅपचे सात कोटी युजर्स असून या नवीन फिचरमुळे वॉट्स अ‍ॅपवर 'उल्लू' बनवणे कठीण होणार ऐवढे मात्र नक्की. 

 

Web Title: On the Whatsapp app, there will be no noise, message will be read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.