'या' ज्वालामुखीतून रोज बाहेर पडत आहे 5 लाख रूपयांचं सोनं, पण मिळवणं अवघड...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:47 PM2024-04-20T12:47:40+5:302024-04-20T12:48:36+5:30

या अ‍ॅक्टिव ज्वालामुखीचं नाव Mount Erebus आहे. नुकतीच नासाने याबाबतची एक माहिती शेअर केली आहे.

Volcano in Antarctica is spewing 80 grams of gold dust everyday | 'या' ज्वालामुखीतून रोज बाहेर पडत आहे 5 लाख रूपयांचं सोनं, पण मिळवणं अवघड...

'या' ज्वालामुखीतून रोज बाहेर पडत आहे 5 लाख रूपयांचं सोनं, पण मिळवणं अवघड...

अंटार्कटिकामध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या ज्वालामुखीतून रो साधारण 80 ग्राम गोल्ड डस्ट बाहेर येत आहे. पण हे सोनं जमा करणं सोपं काम नाही. कारण ज्या ज्वालामुखीतून हे सोनं बाहेर येत आहे ते ठिकाण कितीतरी फूट उंचीवर आहे. या अ‍ॅक्टिव ज्वालामुखीचं नाव Mount Erebus आहे. नुकतीच नासाने याबाबतची एक माहिती शेअर केली आहे.

रोज निघतं इतकं सोनं

न्यूयॉर्क पोस्टनुसार, अंटार्कटिकामधील Mount Erebus मध्ये साधारण 138 अ‍ॅक्टिव होल्क्लॉनो आहेत. जे वेगवेगळ्या गॅस सोडतात. ज्यातून रोज 80 ग्राम क्रिस्टलाइज्ड गोल्डही बाहेर येतं. या सोन्याची किंमत सहा हजार डॉलर लावण्यात आली आहे. भारतीय करन्सीमध्ये ही रक्कम पाच लाख रूपये इतकी होते. नॅशनल एरोनोटिक्स आणि स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थ ऑब्जरवेटरीनुसार Mount Erebus असलेल्या ज्वालामुखीतून रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडतात. गोल्ड डस्ट त्यापैकी एक आहे.

सोनं ओकणारा हा ज्वालामुखी साधारण 12 हजार 448 फूट उंचीवर आहे. गोल्ड डस्ट जिथे जाऊन पडते ते ठिकाण इथून साधारण 621 मैल दूर आहे. नासानुसार, ज्वालामुखी फार पातळ क्रस्टवर आहे. या ज्वालामुखीतून अनेक गोष्टी बाहेर येतात. कधी कधी दगडही बाहेर येतात. Mount Erebus जगाच्या दक्षिण भागावरील ज्वालामुखी आहे.  Lamont Doherty Earth Observatory च्या Conor Bacon ने लाईव्ह सायन्सला सांगितलं की, हा ज्वालामुखी 1972 पासून सतत उद्रेक करत आहे.

Web Title: Volcano in Antarctica is spewing 80 grams of gold dust everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.