या देशातील सैनिक आणि लोक पितात सापाचं रक्त, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:35 AM2024-04-16T09:35:45+5:302024-04-16T09:36:16+5:30

एक देश असाही आहे जिथे सैनिक किंवा काही लोक सापाचं रक्त पितात. हे खूप अजब आहे पण खरं आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

Soldiers of this country drink snake's blood, know the reason | या देशातील सैनिक आणि लोक पितात सापाचं रक्त, कारण वाचून व्हाल अवाक्...

या देशातील सैनिक आणि लोक पितात सापाचं रक्त, कारण वाचून व्हाल अवाक्...

सापाचं नाव जरी काढलं तरी जास्तीत जास्त लोक घाबरतात. कारण या जीवाविषयी अनेकांच्या मनात एक भीती असते. म्हणून साप दूरून दिसला तरी लोक पळून जातात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे सैनिक किंवा काही लोक सापाचं रक्त पितात. हे खूप अजब आहे पण खरं आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

सैनिक पितात सापाचं रक्त

इंडोनेशियामध्ये आजही परंपरागत चिकित्सा पद्धतीवर विश्वास ठेवला जातो. यात जंगली जीव आणि वनस्पतीपासून एखाद्या आजारावर औषध दिलं जातं. तसेच सापाच्या मदतीने त्वचेसंबंधी समस्या दूर केल्या जातात. इंडोनेशियात त्वचेच्या गंभीर समस्येत सापाच्या त्वचेचं पावडर तयार करून लावतात.

त्वचेच्या गंभीर समस्यांसोबतच सापांचा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारातही वापर केला जातो. सापांचं रक्त हृदयरोग असलेल्यांना दिलं जातं. त्याशिवाय असं मानलं जातं की, सापापासून तयार एक औषध दारू पिण्याआधी घेतलं तर लिव्हर खराब होत नाही आणि दारू पिणारे नेहमी निरोगी राहतात.

लैंगिक क्षमता

परंपरागत चिकित्सेनुसार सापाचं रक्त पुरूषांची लैंगिक क्षमता वाढवणारं आणि महिलांना चमकदार त्वचा व निरोगी जीवन देणारं मानलं जातं. हेच कारण आहे की, इंडोनेशियाची राजधानी जर्काता सकाळपासून सायंकाळपर्यंत सापांचं रक्त विकलं जातं. त्याशिवाय सेनेच्या नियमित आहारातही किंग कोब्राच्या रक्ताचा आणि मांसाचा समावेश असतो. कारण त्यांचं रक्त स्टॅमिना वाढवणारं मानलं जातं.

किंग कोब्रा रेस्टॉरंट

इंडोनेशियाच्या मुख्य बाजारात किंग कोब्रा रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या गोडाऊनमध्ये किंग कोब्रा आणि वेगवेगळ्या प्रजातींचे साप असतात. लोकांना मेन्यू बघून ऑर्डर द्यायची असते. इथे लगेच साप पकडून त्याची डिश बनवून दिली जाते. सोबतच सापाचं रक्तही दिलं जातं.

Web Title: Soldiers of this country drink snake's blood, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.