गर्लफ्रेंडचे कपडे आणि डोक्यावर विग लावून तुरूंगातून फरार झाला कैदी, बघत राहिले पोलिसवाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:32 PM2024-03-29T12:32:50+5:302024-03-29T12:33:29+5:30

तशा तर तुरूंगातून पळून जाण्याच्या घटना सामान्य आहेत. पण हा कैदी ज्या पद्धतीने पोलिसांच्या समोरून पळाला ते फारच आश्चर्यकारक आहे.

Prisoner escapes disguised as a woman simply walked out in front of guards | गर्लफ्रेंडचे कपडे आणि डोक्यावर विग लावून तुरूंगातून फरार झाला कैदी, बघत राहिले पोलिसवाले...

गर्लफ्रेंडचे कपडे आणि डोक्यावर विग लावून तुरूंगातून फरार झाला कैदी, बघत राहिले पोलिसवाले...

Prisoners Escapes Disguised as Woman: जगभरातून रोज अजब अजब घटना समोर येत असतात. ज्या आपल्याला नेहमीच हैराण करतात. गुन्हेगारांसंबंधी तर अशा घटना असतात ज्यावर सहजपणे विश्वासही बसत नाही. अशीच एक घटना व्हेनेजुएलामधून समोर आली आहे. इथे एक कैदी तुरूंगातून असा फरार झाला ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

याच म्हणजे मार्च महिन्यात व्हेनेजुएलामधील ही घटना चर्चेत आहे. तशा तर तुरूंगातून पळून जाण्याच्या घटना सामान्य आहेत. पण हा कैदी ज्या पद्धतीने पोलिसांच्या समोरून पळाला ते फारच आश्चर्यकारक आहे. त्याने महिलेचा विग लावला होता आणि त्याला कुणीही ओळखू शकलं नाही.

महिला बनून पळाला कैदी

25 वर्षीय कैदी मॅनुएल लोरेंजो एविला एल्वारॅडोने तुरूंगातून पळून जाण्यासाठी अनोखी आयडिया केली. तो कारबोबो स्टेटच्या El Libertador Prison मध्ये कैद होता. 13 मार्चला त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या हातून एक विग आणि काही कपडे मागवले. भेटीचा वेळ संपला तेव्हा तो डोक्यावर विग लावून बाहेर निघाला. यावेळी त्याने महिलांचे कपडेही घातले होते. हैराण करणारी बाब म्हणजे त्याच्यावर कुणाला संशयही आला नाही. 

ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, दुपारी भेटीच्या वेळेदरम्यान भुरक्या रंगाचा विग लावून आणि मुलीचे कपडे घालून तो बाहेर पडला. यादरम्यान बरेच सुरक्षा रक्षक होते. तरीही त्यांनी त्याला ओळखलं नाही. याआधीही अशी घटना घडली होती. तेव्हा त्या कैद्याला पकडण्यात आलं होतं. 

Web Title: Prisoner escapes disguised as a woman simply walked out in front of guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.