चड्डी चोराचा थैमान! घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स पळवतो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 02:15 PM2024-04-17T14:15:03+5:302024-04-17T14:15:41+5:30

इंडोनेशियामध्ये महिलांच्या अंडरविअर चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात आले होते. आता जबलपूरमध्येही अशीच घटना समोर आली आहे.

Man spotted stealing ladies underwear in Jabalpur watch video | चड्डी चोराचा थैमान! घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स पळवतो

चड्डी चोराचा थैमान! घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स पळवतो

जगभरात चोरींच्या वेगवेगळ्या घटना घडत असतात. कुठे सोन्याचे दागिने चोरी होतात तर कुठे पैशांची. तर काही ठिकाणी महागड्या वस्तूंची चोरी होते. पण सध्या जबलपूरमध्ये एका वेगळ्याच चोरामुळे लोक हैराण आहेत. काही दिवसांआधीच इंडोनेशियामध्ये महिलांच्या अंडरविअर चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात आले होते. आता जबलपूरमध्येही अशीच घटना समोर आली आहे.

जबलपूरमधील हा चोर सोनं-चांदी किंवा पैशांमध्ये वा महागड्या वस्तू नाही तर महिलांचे अंडरगारमेंट्स चोरी करतो. या चोराचा चोरी करतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकंदर काय तर जबलपूरमधील या चड्डी चोरामुळे लोक सध्या हैराण आहेत. 

या चोराने अनेक ठिकाणी चोरी केल्याचं सांगण्यात आलं. इन्स्टावर 
viral_velocity_ नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यात सांगण्यात आलं आहे की, हा चोरी महिलांचे अंडरगारमेंट्स चोरी करतो. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, घराच्या भिंतीवर वाळत घातलेले अंडरगारमेंट्स तो चोरी करून पळताना दिसत आहे. त्याने तोंडाला रूमाल बांधला आहे. 

हा चोरी शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंडरगारमेंट्स चोरी करतो. आधी लोकांना अंडरगारमेंट्स गायब होण्याचं कारण समजलं नाही. पण एका व्हिडीओतून त्याचा खुलासा झाला. पोलिसांनी व्हिडीओ समोर आल्यावर या चोराला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: Man spotted stealing ladies underwear in Jabalpur watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.