यूपी-बिहारमध्ये 'ही' भाजी कापत नाहीत महिला, कारण असं की बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:42 AM2024-04-20T10:42:57+5:302024-04-20T10:43:56+5:30

एका परंपरेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इथे महिला एक भाजी कधीच कापत नाही. ही भाजी घरातील पुरूषच कापू शकतात.

In UP-Bihar women do not cut this vegetable, know the reason | यूपी-बिहारमध्ये 'ही' भाजी कापत नाहीत महिला, कारण असं की बसणार नाही विश्वास

यूपी-बिहारमध्ये 'ही' भाजी कापत नाहीत महिला, कारण असं की बसणार नाही विश्वास

भारताच्या काही भागांमध्ये आजही जुन्या परंपरा फॉलो केल्या जातात. खासकरून यूपी-बिहारमध्ये आजही जुन्या परंपरा फॉलो केल्या जातात. अशाच एका परंपरेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इथे महिला एक भाजी कधीच कापत नाही. ही भाजी घरातील पुरूषच कापू शकतात. इथे कोहळा म्हणजेच पांढरा भोपळा कापायचा असेल तर घरातील महिला घरातील मुलाला किंवा एखाद्या पुरूषाला बोलवतात त्यांच्याकडून ही भाजी कापून घेतात. त्यानंतर महिला ही भाजी बनवतात.

भोपळ्याचं महत्व

उत्तर भारतात कोणताही कार्यक्रम असो त्यात भोपळ्याची भाजी आणि पुरी नसेल तर जेवणच पूर्ण होत नाही. खासकरून जर एखाद्या शुभ कामानंतर जेवण असेल तर ही भाजी असतेच असते. डायजेशनसाठी सुद्धा ही भाजी चांगली मानली जाते. यात असे काही गुण असतात जे पोटात गेलेल्या तेल मसाल्यांना डायलूट करण्यास मदत करतात.

महिला का कापत नाही भोपळा?

मुळात यामागे काहीच वैज्ञानिक तर्क किंवा कारण नाही. पण काही मान्यतांनुसार महिलांद्वारे पांढरा भोपळा म्हणजे कोहळा न कापण्यामागे एक कहाणी आहेत. उत्तर भारतात पांढऱ्या भोपाळ्याला फार पवित्र मानलं जातं. याचा वापर पूजा पाठ करताना केला जातो. काही वेळी भोपळ्याचा बळिही दिला जातो. पण महिला भोपळा का कापत नाही?

उत्तर भारतात काही कथा प्रचलित आहेत. यातील एका कथेनुसार, कोहळा किंवा पांढऱ्या भोपळ्याला येथील घरांमध्ये घरातील मोठा मुलगा म्हणून पाहिलं जातं. याच कारणाने महिला या भाजीवर सगळ्यात आधी चाकू चालवत नाहीत. आधी घरातील पुरूष किंवा मुलगा त्यावर चाकू चालवतो त्यानंतर महिला भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याची भाजी बनवतात. 

Web Title: In UP-Bihar women do not cut this vegetable, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.