लग्न मंडपात न येता अचानक हनीमूनला निघून गेले नवरी-नवरदेव, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:57 AM2024-04-15T10:57:09+5:302024-04-15T11:07:20+5:30

एका महिलेने तिचा भाऊ आणि होणाऱ्या वहिनीच्या लग्नाचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. 

Bride and groom cancel wedding reception went for honeymoon | लग्न मंडपात न येता अचानक हनीमूनला निघून गेले नवरी-नवरदेव, कारण...

लग्न मंडपात न येता अचानक हनीमूनला निघून गेले नवरी-नवरदेव, कारण...

लग्नातील अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी नेहमीच समोर येत असतात. कधी नवरी वेळेवर लग्नास नकार देते तर कधी लग्न मंडपातून पळून जातो. पण तुम्ही कधी असं ऐकलं नसेल की, लग्न मंडपात पाहुणे नवरी-नवरदेवाची वाट बघत आहेत आणि दोघेही मंडपात न येता थेट हनीमूनला निघून गेले. एका महिलेने तिचा भाऊ आणि होणाऱ्या वहिनीच्या लग्नाचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. 

नवरदेवाच्या नाराज बहिणीने रेडिटवर पोस्ट लिहिलं की, मला हे नाही समजलं की, ज्या गोष्टीसाठी त्यांनी पैसे दिले होते ती गोष्ट सोडून गेले कसे. महिलेने सांगितलं की, त्यांच्या एका मित्राशिवाय दुसऱ्या कुणालाही हे माहीत नव्हतं की, ते असं करणार आहेत. हे सगळं त्यांनी लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केलं.

दोघेही आपल्या हनीमूनवर जाण्यासाठी तयार होऊन ब्रिस्टल विमानतळाकडे जात होते. त्यांचा हनीमून काही महिन्यांनी होणार होता. त्यांनी तो आधीचा प्लान कॅन्सल केला आणि एका वेगळ्याच हनीमूनवर निघून गेले.

पण त्यांनी असं केलं त्याचं वेगळंच कारण समोर आलं. एक कारण असं होतं की, त्यांना रिसेप्शनमध्ये यायचं नव्हतं. महिलेने सांगितलं की, माझ्या दुसऱ्या भावाची प्रेयसी गर्भवती आहे. ते याची घोषणा करणार होते आणि ते रिसेप्शनमध्ये लग्न करणार होते. हे केवळ माझ्या आई-वडिलांना माहीत होतं. मला माहीत नव्हतं. मला नव्हतं माहीत माझा भाऊ कसा आहे आणि कोण लग्न करत आहे. म्हणजे नवरदेवाची ईच्छा नव्हती की, त्याच्या लग्नात दुसऱ्या भावाच्या लग्नाची घोषणा केली जावी.

नवरी-नवरदेवाच्या या गोष्टीमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. लोकांनी त्यांना चुकीचं म्हटलं. या पोस्टवर वेगवेगळ्या लोकांनी कमेंट केल्या. एकाने लिहिलं की, नवरी-नवरदेव आणि दुसरा भाऊ सगळे वेडे आहेत. कोण कुणाच्या लग्नात असा गोंधळ करतं?

Web Title: Bride and groom cancel wedding reception went for honeymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.