भारतातील एक असं राज्य जिथे अजिबात आढळत नाही साप, म्हटलं जातं स्नेक फ्री स्टेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:51 PM2024-04-20T16:51:58+5:302024-04-20T16:52:13+5:30

जगातील अनेक देशांमध्ये साप आढळतात. पण भारतात एक असंही राज्य आहे जिथे साप आढळत नाही. 

A state in India where no snakes are found at all is called Snake Free State! | भारतातील एक असं राज्य जिथे अजिबात आढळत नाही साप, म्हटलं जातं स्नेक फ्री स्टेट!

भारतातील एक असं राज्य जिथे अजिबात आढळत नाही साप, म्हटलं जातं स्नेक फ्री स्टेट!

सापांना जगातील सगळ्यात विषारी जीव मानलं जातं. भारतात 350 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आढळतात आणि यातील बऱ्याच विषारी असतात. जगातील अनेक देशांमध्ये साप आढळतात. पण भारतात एक असंही राज्य आहे जिथे साप आढळत नाही. 

भारतात सगळीकडे साप आढळतात. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, भारतात असंही राज्य आहे जिथे साप अजिबात आढळत नाहीत. त्याच राज्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला ज्या राज्याबाबत सांगणार आहोत त्याला 'स्नेक फ्री' स्टेटचा दर्जा मिळाला आहे. एका रिपोर्टनुसार, भारतात आढळणाऱ्या सापांपैकी केवळ 17 टक्के असे साप आहेत जे विषारी आहेत. इतर साप विषारी नसतात.

भारतातील केरळ हे एक असं राज्य आहे जिथे सापांच्या सगळ्यात जास्त प्रजाती आढळतात. पण लक्षद्वीप एक असा केंद्र शासित प्रदेश आहे जिथे एकही साप आढळत नाही. लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या केवळ 64000 हजार आहे.

एका माहितीनुसार लक्षद्वीपमध्ये 36 आयलॅंड आहेत, पण यातील केवळ 10 आयलॅंडवरच लोक राहतात. यात कवाराट्टी, अगाट्टी, अमिनी, कदमत, किलातन, चेतलाट, बिट्रा, आनदोह, कल्पनी आणि मिनिकॉय आयलॅंडचा समावेश आहे.

तसेच लक्षद्वीप एक असं राज्य आहे जिथे सांप  आढळत नाहीत. flora and fauna of lakshadweep नुसार, लक्षद्वीप स्नेक फ्री स्टेट आहे. त्याशिवाय बे रेबिज फ्री स्टेटही आहे. कारण इथे कुत्रेही आढळत नाहीत. मात्र, इथे कावळ्यांसारखे खूपसारे पक्षी आढळतात. या आयलॅंडवर सायरेनिया किंवा 'समुद्री गाय' आढळतात ज्या लुप्त होत आहेत.

Web Title: A state in India where no snakes are found at all is called Snake Free State!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.