विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 07:29 PM2024-05-03T19:29:58+5:302024-05-03T19:31:48+5:30

उन्हाळी सुटीनिमित्त विवाहिता भावाच्या घरी आली होती, नातेवाईकांच्या भेटीनंतर घरी जाताना झाला अपघात

Two people died in two separate accidents in Bhokardan | विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

भोकरदन ( जालना) : तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शुभम जंजाळ आणि अश्विनी फडके अशी मृतांची नावे आहेत. 

या बाबत माहिती अशी की, आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन -सिल्लोड रोडवरील हॉटेल राजस्थानी जवळ दोन कारची सामोरासमोर धडक झाली. यात एक कारमधील शुभम दत्तात्रय जंजाळ ( 29) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक एवढी भीषण होती की कारने तीनते चार वेळेस उलटली. अपघातात सुनिल पंडित शेळके वय 29, लता पंडित शेळके वय 45, अनिल पंडित शेळके वय 13, आकाश उत्तमराव इंगळे वय 18, तनुश्री सुनिल शेळके वय 9 महीने, कोमल सुनिल शेळके वय 10 वर्ष ( सर्व रा चांदनझिरा जालना) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. मृत शुभम माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा जंजाळ यांचा चालक होता.

भावाकडे सुटीत आलेल्या विवाहितेचा मृत्यू
अश्विनी परशराम फडके ( 30 वर्ष रा वाघोली जिल्हा धाराशीव) तालुक्यातील वालसावगी येथे उन्हाळी सुट्या असल्याने भावाकडे आल्या होत्य. सकाळी त्या भावासोबत दुचाकीवर नातेवाईकांना भेटण्यासाठी भोकरदनला आल्या होत्या. परत वालसावगी येथे जात असताना भायडी येथे दुचाकी गतिरोधकावर आढळली. त्यामुळे अश्विनी फडके या गाडीवरून खाली पडल्या. यात डोक्याला मार लागल्याने अश्विनी गंभीर जखमी झाल्या. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन चिमुकली मुले, पती असा परिवार आहे.

Web Title: Two people died in two separate accidents in Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.