VIDEO - भन्नाट, तुम्ही कधी कॅलक्युलेटरचा असा वापर पाहिलाय का?

By Admin | Published: March 14, 2017 02:52 PM2017-03-14T14:52:54+5:302017-03-14T14:59:29+5:30

काही वर्षांपूर्वी कॅलक्युलेटरचे एक महत्व होते. पदवी शिक्षणात, महिन्याचा हिशोब लावताना कॅलक्युलेटरचा मोठया प्रमाणावर उपयोग व्हायचा.

VIDEO - False, have you ever seen such a use of calculator? | VIDEO - भन्नाट, तुम्ही कधी कॅलक्युलेटरचा असा वापर पाहिलाय का?

VIDEO - भन्नाट, तुम्ही कधी कॅलक्युलेटरचा असा वापर पाहिलाय का?

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

टोक्यो, दि. 14 - काही वर्षांपूर्वी कॅलक्युलेटरचे एक महत्व होते. पदवी शिक्षणात, महिन्याचा हिशोब लावताना कॅलक्युलेटरचा मोठया प्रमाणावर उपयोग व्हायचा. पण मोबाईल फोनमध्येच कॅलक्युलेटरची सोय उपलब्ध झाल्यापासून स्वतंत्र कॅलसीचा उपयोग कमी झाला. जापान आज तंत्रज्ञानामध्ये प्रगत देश असला तरी अजूनही तिथे कॅलक्युलेटरचे महत्व कमी झालेले नाही. 
 
जापानी लोक आजही तितक्याच गांर्भीयाने कॅलसीचा उपयोग करतात. असुका कामीमुरा ही तरुणी ज्या पद्धतीने कॅलक्युलेटरचा वापर करते ते पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका सेकंदाला कॅलसीची 9 बटण दाबण्याची क्षमता असुकामध्ये आहे. कॅलक्युलेटरवरुन तिची बोट  इतक्या वेगाने फिरतात कि, तुम्हाला वाटेल तिच्या हातून चूक होईल. पण शेवटी असुका कामीमुराने केलेला हिशोब अचूक असतो. तिला कॅलसी वापरातून पाहून तुमचा तुमच्या डोळयावर विश्वास बसणार नाही. 
 
हे कस शक्य आहे असा प्रश्न तुमच्या मनात येईल. असुका कामीमुरा नागासाकी येथील कंपनीत नोकरीला आहे. असुका रोबोटसारखी कॅलक्युलेटवर काम करते. अनेक वर्षांच्या मेहनतीने तिने ही हातोटी मिळवली आहे. कॅलक्युलेटरचा वापर अधिक प्रभावी आणि अचूकतेने करता यावा यासाठी जापानमध्ये कॅलक्युलेटरने मोजणी करण्याच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. अनेक कॅलसी क्लब असून शाळा सुटल्यानंतर मुले तिथे शिकण्यासाठी जातात. शनिवार-रविवार असे दोन दिवस तिथे सात-सात तास कॅलसी वापरण्याची प्रॅक्टीस चालते. 

Web Title: VIDEO - False, have you ever seen such a use of calculator?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.