आश्चर्य! कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी

By admin | Published: April 19, 2017 04:53 PM2017-04-19T16:53:13+5:302017-04-19T16:53:13+5:30

कॅनडातील सर्वात मोठी ग्लेशियर्स (हिमनदी)पैकी एक मोठी नदी अवघ्या चार दिवसांत गायब झाली आहे.

Surprise! The river disappeared in only four days in Canada | आश्चर्य! कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी

आश्चर्य! कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी

Next

ऑनलाइन लोकमत
ओटावा, दि. 19 - कॅनडातील सर्वात मोठी ग्लेशियर्समधील एक मोठी नदी अवघ्या चार दिवसांत गायब झाली आहे. यामुळे हवामान आणि जल अभ्यासकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गायब झालेल्या "स्लिम्स नदी"ची रुंदी काही ठिकाणी तब्बल 150 मीटर इतकी मोजण्यात आली होती.

कॅनडातल्या युकून प्रांतात विशाल कास्कावुल्श ग्लेशियरपासून उत्पत्ती झालेली ही स्लिम्स नदी अनेक वर्षांपासून वाहत होती. मात्र गेल्या वर्षी हे ग्लेशियरजवळील बर्फ वेगाने वितळल्याने आलेलं पाणी अलेस्क या दुसऱ्याच नदीमध्ये मिसळून अलास्काच्या आखाताकडे गेले आहे. मूळ ग्लेशियरपासून हे ठिकाण हजारो किमी दूरवर आहे. ग्लेशियरचे पाणी याआधी स्लिम व अलेस्क या नद्यांमध्ये जात असत. मात्र यावेळी सर्व पाणी एकाच नदीद्वारे प्रशांत महासागरात जाऊन मिळाल्याचं आढळून आल्याचं निरीक्षण ग्लेशियरचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाने केलं आहे.

शास्त्रज्ञांना नदी पूर्णत: कोरडी पडल्याचे आढळून आले आहे. दिशा बदलून दुसऱ्याच मार्गाने नदीचा प्रवाह वाहू लागल्याच्या प्रकारास शास्त्रज्ञांनी "रिव्हर पायरसी" असे संबोधले आहे. स्लिम्स नदीबाबतही हाच प्रकार घडल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आल्याचंही शास्त्रज्ञ म्हणाले आहेत. भूतकाळामध्ये याआधी रिव्हर पायरसी घडल्याचे पुरावे सापडले आहेत. मात्र सद्यस्थितीत असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आलेले नाही. रिव्हर पायरसीचा अभ्यास करण्यासाठी हजारो वा लक्षावधी वर्षांपूर्वीच्या भौगोलिक घटकांचा मागोवा घ्यावा लागतोय. मात्र रिव्हर पायरसीची ही घटना 21व्या शतकात पहिल्यांदाच घडली आहे, असे या अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व करणारे भूगर्भशास्त्रज्ञ डॅन शुगर म्हणाले आहेत. चार दिवसांत एक नदी अक्षरश: गायब झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, जागतिक हवामान बदलाचे आव्हान आणि व्याप्ती आपल्या धारणेपेक्षा अत्यंत गंभीर असल्याचं मतंही शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. 

Web Title: Surprise! The river disappeared in only four days in Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.