टर्कीत विवाह सोहळ्यात आत्मघाती हल्ला, ३० ठार

By admin | Published: August 21, 2016 02:44 AM2016-08-21T02:44:54+5:302016-08-21T07:42:09+5:30

टर्की शहराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या गाझिटेप येथे एका विवाह सोहळ्यात बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Suicide attack in Turkey wedding ceremony, 30 killed | टर्कीत विवाह सोहळ्यात आत्मघाती हल्ला, ३० ठार

टर्कीत विवाह सोहळ्यात आत्मघाती हल्ला, ३० ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
टर्की, दि. २१ - टर्की शहराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या गाझिनटेप येथे एका विवाह सोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, ९४ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझिनटेप शहरातील एका विवाह सोहळ्याला निशाना साधत दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात ३० जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर, ९४ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 
गाझिनटेप शहरावर करण्यात आलेला आत्मघाती बॉम्ब हल्ला अत्यंत क्रूर असून हे कृत्य कुर्दिश दहशतवाद्यांचे किंवा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचं आहे,असे टर्कीचे उपपंप्रधान मेहमेत सिमसेक यांनी सांगितले. 
गेल्या जून महिन्यात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इस्तांबुल येथील विमानतळावर हल्ला केला होता. त्यात ४४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा दहशतवाद्यांनी गाझिनटेप शहराला निशाना साधला. 
 

Web Title: Suicide attack in Turkey wedding ceremony, 30 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.