आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके

By Admin | Published: August 21, 2016 09:07 AM2016-08-21T09:07:49+5:302016-08-21T09:07:49+5:30

परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले़ तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.

Phelps, who went on to commit suicide, won 23 gold medals in the Olympics | आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके

आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके

googlenewsNext

- पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : आत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडूऩ

विचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता़ एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं. निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं.

आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. ...आणि मग तो परतला़ परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले़ तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.

रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्सने स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली आहे. फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली आहेत. अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या़ त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला़ रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला़ आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं.

खरं तर त्याला पाण्यात उडी मारल्यानंतर त्यात जास्त वेळ चेहरा ठेवायला आवडत नाही़ नाका-तोंडात पाणी जाण्याची त्याला भीती वाटे. त्यामुळं सराव करतानाही तोंड पाण्यात कमीत कमी वेळ ठेवण्याचा त्याचा शिरस्ता असे. पाहता पाहता तो पोहण्यात इतका पारंगत झाला की त्यानं दहाव्या वर्षीच एक राष्ट्रीय विक्रम नोंदवून ठेवला़ त्याच वर्षी त्याला बॉब बाउमन नावाचे प्रशिक्षक मिळाले अन् त्याच्या स्विमिंगच्या करिअरला कलाटणी मिळाली. तेच त्याचे आवडते प्रशिक्षक बनले. ह्यह्यत्यांच्याशिवाय मी पाण्यातच उतरणार नाहीह्णह्ण, असं आजही फेल्प्स म्हणतो़ बॉब त्याला सॉलिटरी मॅन म्हणतात. एकाकी माणूस. त्यांच्या मते या पोराचं एकच ध्येय असतं. पाण्यात उतरल्यावर शक्य तितक्या लवकर अंतर पार करायचं.

वडिलांनी त्याच्या आईशी घटस्फोट घेतल्यानंतर फेल्प्स एकटा पडला़ त्याला कुटुंबात राहणंही शक्य वाटेनासं झालेलं़ तेव्हा प्रशिक्षक बॉबनं त्याला वडीलकीचा आधार दिला़ बॉबनंच त्याला मोठं केलं. त्यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर ह्यफ्लाइंग फिशह्ण बनलेला फेल्प्स एक-एक सुवर्णपदकांवर नाव कोरत गेला. त्यानं स्वत:च्या नावावर एवढी ऑलिम्पिक पदकं नोंदवून ठेवली आहेत की अनेक देशांच्या अख्ख्या आॅलिम्पिक संघांनाही त्याला गाठणं मुश्कील व्हावं!

खरं तर या यशाच्या उन्मादात सुरुवातीच्या काळात फेल्प्स वाहवत गेला. कधी-कधी तो भरघोस दारू ढोसायचा. तसाच गाडी दामटायचा़ पोलिसांनी त्याला २००४ साली असंच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अपराधापोटी पकडलं. त्यावेळी तो दोषीही ठरला आणि १८ महिन्यांची शिक्षा झाली़ शिवाय २५० डॉलरचा दंडही भरावा लागला. शिवाय मदर्स अगेन्स्ट ड्रंक ड्रायव्हिंगच्या शिबिरात सक्तीच्या समाजसेवेसाठी जावं लागलं.

त्यानंतर पाच वर्षांनी फेल्प्सचा एक फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत तो अंमली पदार्थ घेताना दिसत होता़ हा फोटो खोटा-बनावट असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं होतं. पण तो खरा असल्याचं आणि एका पार्टीत घेतला गेल्याचं त्यानं कबूल केलं. या फोटोचा मोठा फटका फेल्प्सला बसला. केलाँग नावाच्या कंपनीनं त्याचं प्रायोजकत्व काढून घेतलं; शिवाय अमेरिकेच्या स्विमिंग संघटनेनं फेल्प्सवर तीन महिन्यांची बंदीही घातली़ असाच अनुभव एकदा दोन वर्षांपूर्वी आला होता़ फेल्प्सला अटक झाली होती़ कारण पुन्हा त्यानं अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवलं होतं. पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी त्याच्यावर ओढवली़

याच काळात त्याला नैराश्यानं ग्रासलं इतकं की तो आत्महत्त्येचाही विचार करत होता़ आता काहीच शिल्लक राहिलं नाही... कमबॅक करणं शक्य नाही अशा नकारार्थी विचारांनी त्याला घेरलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी फेल्प्सला मित्रांनी मदत केली़ सहा महिने मेडिटेशन करायला लावलं. त्यातून तो बाहेर पडला. माणूस बनला. पुन्हा नव्या जोशानं पाण्यात उतरला़. आताच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे नवे टोक गाठून त्यानं थांबायचं ठरवलंय़ आता तो एक लेकराचा बाप बनलाय आणि त्याचा चांगला सांभाळ त्याला करायचाय़ अन् चांगली पिढी घडवायचीय, खेळाचं चांगलं वातावरण निर्माण करायचंय़.

फेल्प्स ३०० कोटींचा धनी

मायकेल फेल्प्स भलेही यशाच्या शिखरावर असेल आणि त्यानं मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या विक्रमी असेल पण त्याची कमाई एखाद्या स्टार फुटबॉलपटूपेक्षा कमीच आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड संघात असण्याची फी ६०० कोटी रुपये आहे़ आणि फेल्प्सचं प्रायोजकांमधून मिळणारं उत्पन्न ३०० कोटी़ कधीकधी वर्षाला दुप्पट कमाई दाखवणारे आकडेही आहेत पण ते सारे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे़ त्यातून जाणारा कर आणि इतर खर्च वगळता फेल्प्सला ३०० कोटींच्या आसपास समाधान मानावं लागतं. अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा मात्र फेल्प्सचं उत्पन्न ३८ टक्के अधिक आहे़.

Web Title: Phelps, who went on to commit suicide, won 23 gold medals in the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.