नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार

By admin | Published: July 29, 2015 01:52 AM2015-07-29T01:52:21+5:302015-07-29T01:52:21+5:30

नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द काढून टाकण्यास नेपाळच्या राजकीय पक्षांनी मान्यता दिली आहे. नेपाळमधील बहुसंख्य नागरिकांना या नव्या

In Nepal, the word 'secular' will be used | नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार

नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार

Next

काठमांडू : नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द काढून टाकण्यास नेपाळच्या राजकीय पक्षांनी मान्यता दिली आहे. नेपाळमधील बहुसंख्य नागरिकांना या नव्या घटनेत सेक्युलॅरिझमऐवजी ‘हिंदू’ किंवा ‘धार्मिक स्वातंत्र्य’ असा शब्द हवा आहे.
दशकभराच्या बंडखोरीनंतर मुख्य प्रवाहात सामील झालेल्या युनिफाईड कम्युनिस्ट पार्टी आॅफ नेपाळ-माओईस्ट सरकारने २००७ मध्ये नेपाळ हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयानंतर नेपाळची शेकडो वर्षांचा इतिहास असलेली जगातील एकमेव हिंदू राजवट अशी ओळख संपली होती. (वृत्तसंस्था)



नेपाळच्या लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू आहेत.
नव्या घटनेवर नागरिकांची मते मागविण्यात आली होती. त्यात बहुसंख्य लक्षावधी नागरिकांनी घटनेतून धर्मनिरपेक्ष (सेक्युलॅरिझम) शब्द काढून टाकण्याची सूचना केल्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या भूमिकेत एकदम विरुद्ध बदल करावा लागला.
सेक्युलॅरिझम हा शब्द घटनेत चपखल बसत नाही, त्यामुळे आम्ही त्याऐवजी दुसरा शब्द समाविष्ट करणार आहोत, असे यूसीपीएन-माओईस्टचे अध्यक्ष पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: In Nepal, the word 'secular' will be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.