‘नासा’च्या मानवरहित मालवाहू रॉकेटचा स्फोट

By admin | Published: October 30, 2014 12:35 AM2014-10-30T00:35:44+5:302014-10-30T00:35:44+5:30

अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे एक मानवरहित रॉकेट प्रक्षेपण झाल्यानंतर लगेचच स्फोट होऊन कोसळले आहे. व्हजिर्निया येथे हा अपघात झाला,

NASA's unmanned cargo rocket blast | ‘नासा’च्या मानवरहित मालवाहू रॉकेटचा स्फोट

‘नासा’च्या मानवरहित मालवाहू रॉकेटचा स्फोट

Next
वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे एक मानवरहित रॉकेट प्रक्षेपण झाल्यानंतर लगेचच स्फोट होऊन कोसळले आहे. व्हजिर्निया येथे हा अपघात झाला, रॉकेट मालवाहू होते व त्याच्या प्रक्षेपणाचे कंत्रट खाजगी कंपनीला देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर सामान घेऊन जाण्यासाठी हे रॉकेट तयार करण्यात आले होते.  ऑर्बिटल सायन्स कॉर्पोरेशनने हे 14 मजली रॉकेट बांधले होते. स्पेस स्टेशनवर सायगAस हे मालवाहू यान नेण्यासाठी रॉकेटला बसविण्यात आले व सायंकाळी 6.22 वाजता व्ॉलॉप्स फ्लाईट फॅसिलिटी येथून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले; पण लगेचच स्फोट झाला व आगीचा लोळ उठला . ऑर्बिटल सायन्स कंपनीचे शेअर्स हा अपघात झाल्याचे कळताच कोसळले आहेत. अपघाताचे कारण लगेच कळू शकले नाही; पण यानातून नेल्या जाणा:या सामानात क्रायटोग्राफिक उपकरणो होती. त्यामुळे अपघात झालेल्या जागेचा कचरा सुरक्षितपणो साफ केला पाहिजे, असे कंपनीचे व्यवस्थापक माईक पिनास्टेन यांनी म्हटले आहे.  (वृत्तसंस्था)

 

Web Title: NASA's unmanned cargo rocket blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.