चीनमध्ये भूस्खलन; 100 लोक अडकल्याची शक्यता

By admin | Published: June 24, 2017 09:33 AM2017-06-24T09:33:55+5:302017-06-24T09:40:01+5:30

चीनमधील सिच्युआन प्रांतात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येते आहे

Landslide in China; 100 people likely to get stuck | चीनमध्ये भूस्खलन; 100 लोक अडकल्याची शक्यता

चीनमध्ये भूस्खलन; 100 लोक अडकल्याची शक्यता

Next

ऑनलाइन लोकमत

बीजिंग, दि. 24- चीनमधील सिच्युआन प्रांतात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येते आहे. या भूस्खलनात सुमारे 100 पेक्षा जास्त लोक गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चिनी माध्यमांच्या माहितीनूसार, सिच्युआन प्रांतातील मॅक्सियन काऊंटी इथे झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये 40 घरं उद्धस्त झाल्याची भिती व्यक्त करण्यात येते आहे. 
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावात भूस्खलन झालं आहे.  घटनेनंतर बचावपथकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सकाळी सहा वाजता ही घटना घडली असून नदीच्या प्रवाहातही अडथळा निर्माण झाला आहे. 
चीनमधील सरकारकडून तात्काळा आपत्ती व्यवस्थापनाचं पथक तैनात करण्यात आलं असून बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  चीनच्या डोंगराळ भागामध्ये वारंवार भूस्खलानाच्या घटना घडत असतात. खूप पाऊस असताना तर नेहमीच या घटना तेथे होतात. याआधी जानेवारी महिन्यात झालेल्या भूस्खलनात 12 जणांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Landslide in China; 100 people likely to get stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.