नऊ वर्षांपासून जेवण वर्ज्य तरीही जिवंत

By admin | Published: June 24, 2017 02:41 AM2017-06-24T02:41:41+5:302017-06-24T02:41:41+5:30

आम्ही जेवण न केल्यास काय होईल? शरीरात ऊर्जा राहणार नाही व आम्ही आजारीही पडू. उपवासाच्या दिवशी अनेकांना शरीरात त्राण नसल्यासारखे वाटते

Evergreens are still alive for nine years | नऊ वर्षांपासून जेवण वर्ज्य तरीही जिवंत

नऊ वर्षांपासून जेवण वर्ज्य तरीही जिवंत

Next

नवी दिल्ली : आम्ही जेवण न केल्यास काय होईल? शरीरात ऊर्जा राहणार नाही व आम्ही आजारीही पडू. उपवासाच्या दिवशी अनेकांना शरीरात त्राण नसल्यासारखे वाटते. एक दिवस जेवण नाही केले तरी आपली अवस्था गलितगात्र होते तर मग ज्यांनी नऊ वर्षांपासून काहीही खाल्ले नाही त्यांचे काय? होय, तुमचा विश्वास बसणार नाही; परंतु अमेरिकेतील एका जोडप्याने नऊ वर्षांपासून जेवण घेतलेले नाही आणि ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. एखाद वेळी चवीसाठी थोडेबहुत काय खाल्ले तेवढेच. इतरवेळी ते पूर्णपणे निरंकार राहतात. आपल्याला काही खाण्याची गरजही वाटत नाही. शरीराच्या पोषणासाठी आम्ही वैश्विक ऊर्जेचा वापर करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. कॅमिला कॅस्टेलो (वय ३४) आणि त्यांचे पती अकाही रिकार्डो (वय ३६) कॅलिफोर्नियात राहतात. आपण २००८ नंतर काहीही खाल्ले नसल्याचा त्यांचा दावा आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते अन्नाच्या कणालाही शिवलेले नाहीत. आता ते कधी कधी थोडेफार खातात. आपण गर्भारपणाच्या काळातही काही खाल्ले नव्हते, असा कॅमिलाचा दावा आहे. गर्भातील बाळाच्या पोषणासाठी खरेतर अधिक मात्रेत आणि पौष्टिक अन्न घेण्याची गरज असते. मात्र, जेवण वर्ज्य असतानाही कॅमिलाने सामान्याहून अधिक सुदृढ बालकाला जन्म दिला. आम्हाला आमच्या श्वासोच्छ्वासातून पुरेशी ऊर्जा आणि पोषकद्रव्ये मिळतात, असा कॅमिला आणि तिच्या पतीचा दावा आहे. या पद्धतीला ब्रेथरियनिज्म असे म्हणतात. या पद्धतीचा अवलंब करणारे लोक ब्रेथरियन म्हणून ओळखले जातात. ं

Web Title: Evergreens are still alive for nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.