पृथ्वी का वितळत नाही? उत्तर मिळाले!

By Admin | Published: February 18, 2017 01:28 AM2017-02-18T01:28:51+5:302017-02-18T01:28:51+5:30

पृथ्वीच्या गर्भात असलेल्या गोळ्याची ऊर्जा आणि त्याची उष्णता सूर्यावरील तापमानाएवढीच असली तरी पृथ्वी का विरघळत नाही, या

Earth does not dissolve? Get the answer! | पृथ्वी का वितळत नाही? उत्तर मिळाले!

पृथ्वी का वितळत नाही? उत्तर मिळाले!

googlenewsNext

स्वीडन : पृथ्वीच्या गर्भात असलेल्या गोळ्याची ऊर्जा आणि त्याची उष्णता सूर्यावरील तापमानाएवढीच असली तरी पृथ्वी का विरघळत नाही, या प्रश्नाचे उत्तर केटीएच रॉयल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांना मिळाले आहे.
पृथ्वीच्या गर्भात मध्यभागी तळपत्या लोखंडासारखा गोळा आहे. त्याचे तापमान सहा हजार सेंटिग्रेट (जवळपास सूर्याएवढे) आहे. ही प्रखर ऊर्जा पृथ्वीला आतून वितळवत का नाही, हा प्रश्न अनुत्तरीत होता. नव्या अभ्यासानुसार, या ऊर्जेच्या दुसऱ्या थराचा भाग वितळतो. मात्र तो एकीकडून दुसरीकडे जातो त्यामुळे तिसऱ्या थरावर परिणाम होत नाही. कांद्यासारखा पृथ्वीचा आतील आकार आहे. सर्वात आतील थराचे तापमान सर्वाधिक आहे. पत्ते पिसल्याप्रमाणे या आतील थरातील द्रव भाग खालून वर आणि वरून खाली होत असतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Earth does not dissolve? Get the answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.