AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:05 AM2024-05-08T10:05:28+5:302024-05-08T10:24:00+5:30

AstraZeneca ने विकसित केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीबाबत गोंधळ सुरू असतानाच एक नवीन अपडेट समोर आली आहे. कंपनी आता जगभरातून आपली लस मागे घेत आहे.

AstraZeneca withdraws Corona vaccine from around the world A big step by the company after the new disclosure | AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल

AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल

काही दिवसापूर्वी कोव्हिशिल्ड लसीमुळे दुष्परिणाम होत असल्याचा मोठा खुलासा झाला होता. यामुळे जगभरात मोठा गोंधळ झाला होता. दरम्यानन आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. 

AstraZeneca ने विकसित केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीबाबत गोंधळ सुरू असतानाच एक नवीन अपडेट समोर आली आहे. कंपनी आता जगभरातून आपली लस मागे घेत आहे. काही दिवसांपूर्वीच औषध कंपनी AstraZeneca ने कोर्टात लसीचे धोकादायक दुष्परिणाम मान्य केले होते. यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. मात्र, साइड इफेक्टचा वाद आणि लस मागे घेण्याची प्रक्रिया हा योगायोग असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. रिपोर्ट्सनुसार, AstraZeneca ने देखील लस मागे घेण्याबाबत माहिती दिली आहे.

चिनी चँग’इ-६ व पाकिस्तानी ‘आयक्यूब-क्यू’, पाकिस्तान काही पाठ सोडेना! 

काही दिवसांपूर्वी औषध उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटनच्या न्यायालयात कोरोना लसीचे दुष्परिणाम मान्य केले होते. AstraZeneca ने विकसित केलेल्या कोरोना लसीच्या दुष्परिणामांबाबत ५० हून अधिक लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती. AstraZeneca च्या Vaxzevria या लसीबद्दल प्रश्न उपस्थित केले. कंपनीचे म्हणणे आहे की, वॅक्सझेव्हरिया लसीचे दुष्परिणाम दुर्मिळ आहेत. ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, साइड इफेक्ट्सबाबत बराच गदारोळ झाल्यानंतर ॲस्ट्राझेनेकाने ही लस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

AstraZeneca चे मोठे विधान जगभरातून Vaxzevria लस मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान आले आहे. साइड इफेक्ट्स आणि लस मागे घेण्याची वेळ याविषयी कोर्टात झालेली चर्चा हा निव्वळ योगायोग असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या दोघांचा काही संबंध नाही. औषध उत्पादक कंपनीचे म्हणणे आहे की, कोविड-19 लस वॅक्सझेव्हरिया व्यावसायिक कारणांमुळे बाजारातून मागे घेतली जात आहे. कंपनीने सांगितले की, ही लस आता तयार किंवा पुरवली जात नाही. लस मागे घेण्याचा निर्णय 'निव्वळ योगायोग' असल्याचे सांगून, लस मागे घेण्याचा  आणि टीटीएसचा संबंध नाही.

AstraZeneca द्वारे ५ मार्च रोजी Vaxzevria लस मागे घेण्यासाठी अर्ज सादर केला होता. ते ७ मे पासून लागू झाले आहे. रक्ताच्या गुठळ्या आणि कमी रक्तातील प्लेटलेट तयार होण्याच्या दुर्मिळ दुष्परिणामामुळे वॅक्सझेव्ह्रिया जागतिक तपासणीत आहे. फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये, ॲस्ट्राझेनेकाने कबूल केले की, लस अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये TTS होऊ शकते. TTS मुळे ब्रिटनमध्ये किमान ८१ मृत्यू तसेच अनेक गंभीर दुष्परिणाम झाले आहेत. ॲस्ट्राझेनेका लसीबाबत ५० जणांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Web Title: AstraZeneca withdraws Corona vaccine from around the world A big step by the company after the new disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.