ब्राझीलमध्ये आणखी एक निर्भया, 16 वर्षांच्या मुलीवर 33 जणांचा सामूहिक बलात्कार

By admin | Published: May 27, 2016 11:37 PM2016-05-27T23:37:00+5:302016-05-27T23:50:40+5:30

रिओ ऑलिम्पिकची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच ब्राझीलमध्ये एक धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे.

33-year-old gang raped in Brazil, 16-year-old girl in Nirbhaya | ब्राझीलमध्ये आणखी एक निर्भया, 16 वर्षांच्या मुलीवर 33 जणांचा सामूहिक बलात्कार

ब्राझीलमध्ये आणखी एक निर्भया, 16 वर्षांच्या मुलीवर 33 जणांचा सामूहिक बलात्कार

Next

ऑनलाइन लोकमत

साओ पावलो, दि. 27- रिओ ऑलिम्पिकची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच ब्राझीलमध्ये एक धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर तब्बल 30 हून अधिक जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी हजारो खेळाडू दाखल होणार असतानाच या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  

पीडित अल्पवयीन मुलगी रात्रीच्या सुमारास बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी गेली असताना पहाटे या घटनेनं ती पुरती हादरून गेली. पीडित मुलीला पहाटेच्या सुमारास बंदुकधारी आणि रायफल बाळगणा-या 33 जणांनी घेरलं होतं. आणि तिच्याकडे जोर जबरदस्तीनं शरीर सुखाची मागणी करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या मुलीवर 36 तासांहून अधिक काळ सतत बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

पीडित मुलगी नग्नावस्थेत आढळून आली असून, ती नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तिच्या शरीरावर अश्लील भाषेत काही लिहिलं असून, अनेकांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत. ते फोटो काढून सोशल मीडियावरही टाकल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.  पीडित मुलीला या घटनेनं जबर धक्का बसल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचाही समावेश आहे. सोशल मीडियावर तिचे न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका मुलालाही अटक करण्यात आली आहे. 

Web Title: 33-year-old gang raped in Brazil, 16-year-old girl in Nirbhaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.