​Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2017 11:39 AM2017-06-22T11:39:11+5:302017-06-22T17:09:11+5:30

स्लिम, फिट आणि सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या डायटमध्ये नेमका कशाचा समावेश असतो ते जाणून घ्या...!

Health: Japanese celebrity 'ha' special formula used to lose weight! | ​Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !

​Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !

googlenewsNext
ong>-Ravindra More
भारतातील सेलिब्रिटींपेक्षा जापानी सेलिब्रिटींचे वजन नियंत्रणात असून त्या फिटनेससाठी खूपच काळजी घेतात. विशेष म्हणजे त्यांचे डायटकडे खास लक्ष असते. स्लिम, फिट आणि सुंदर दिसण्यासाठी त्यांच्या डायटमध्ये नेमका कशाचा समावेश असतो ते आज आम्ही आपणास सांगत आहोत. 
अनेक जापानी सेलिब्रिटी वजन कंट्रोल करण्यासाठी रोज सोया मिल्कमध्ये मध मिसळून पितात. यामुळे फॅट लवकर बर्न होते आणि वजन वाढत नाही. आपलेही वजन वाढलेले असेल आणि लठ्ठपणाने त्रस्त असाल तर जापान्यांचा हा फॉम्यूर्ला आपल्याला फायदेशीर ठरु शकतो. 
 
घरात सोया मिल्क कसे बनविणार ?
सोयाबीन रात्री पाण्यात भिजवा. सकाळी हे थोडेसे मॅश करा. यामुळे साल वेगळे होईल. आता हे पाणी टाकून बारीक करा आणि गाळून घ्या. गाळलेले दूध उकळून घ्या. हे दूध कोमट करुन त्यात मध टाका आणि प्या.

सोया मिल्कमधून फॅटचे प्रमाण असे करा कमी 
सोया मिल्कमधून फॅटचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वेळा दूध उकळून याची साय काढून घ्या. आता यामध्ये पाणी मिसळून गरम करा. वरुन मध टाकून प्यावे. दूधाची टेस्ट बदलण्यासाठी त्यात विलायची पावडर टाकू शकता. 

* काय आहेत फायदे

या दूधात कॅलरीज कमी असल्याने यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस होते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 
 
* या दूधात विटॅमिन डी आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात.

* या लोह असल्याने अ‍ॅनेमियापासून बचाव होतो. 

* यात प्रोटीन असल्याने मसल्स मजबूत होतात. 

* यात अ‍ॅँटीआॅक्सिडेंट्स असल्याने कॅन्सरपासून बचाव होतो.  

* या फायबर असल्याने पचनसंस्था सुदृढ होते.

* कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असल्याने ह्रदयासंबंधी समस्या कमी होतात.

* यात आयसोफ्लेवोंस असल्याने सांधेदुखी होत नाही.

* यात विटॅमिन बी१२ असल्याने अशक्तपणा दूर होतो.

Also Read : ​Fitness Secret : ​भूमी पेडणेकरने असे केले ३० किलो वजन कमी !
                    : HEALTH : ​पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?           

Web Title: Health: Japanese celebrity 'ha' special formula used to lose weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.