दह्यात कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने वाढते त्याची पॉवर, मिळतील अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:17 AM2024-04-18T10:17:58+5:302024-04-18T10:29:24+5:30

उन्हाळ्यात पचनासंबंधी समस्या कॉमन असतात, त्यामुळे दही खूप फायदेशीर मानलं जातं.

Add these foods in curd or dahi to enhance nutrient | दह्यात कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने वाढते त्याची पॉवर, मिळतील अनेक फायदे!

दह्यात कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने वाढते त्याची पॉवर, मिळतील अनेक फायदे!

उन्हाळ्यात खूप लोक आवडीने दह्याचं सेवन करतात. कारण या दिवसात दही खाण्याचे आरोग्याला खूपसारे फायदे मिळतात. दह्यात असे अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. दह्यामधील प्रोबायोटिक्स पोटासाठी फायदेशीर मानलं जातं. याने पचन क्रिया चांगली होते. उन्हाळ्यात पचनासंबंधी समस्या कॉमन असतात, त्यामुळे दही खूप फायदेशीर मानलं जातं. अशात दह्यात काय टाकून खावे आणि दह्याचे फायदे आज आम्ही सांगणार आहोत.

इम्यूनिटी मजबूत

उन्हाळ्यात इन्फेक्शनचा धोका अधिक राहतो. दह्यात इम्यूनिटी सिस्टीम मजबूत करणारे गुण असतात. जे शरीराला उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचवतात.

सूज आणि त्वचेच्या समस्या होतील दूर

दह्यामध्ये शरीरातील सूज कमी करणारे काही गुण असतात. उन्हाळ्यात अनेकदा त्वचेसंबंधी समस्या वाढतात. दह्यामुळे या समस्या कमी करण्यास मदत मिळते.

हाडे होतील मजबूत

दह्यात कॅल्शिअम, प्रोटीन आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व भरपूर असतात. अशात नियमितपणे तुम्ही दह्याचं सेवन केलं तर शरीराला सगळे आवश्यक पोषक तत्व मिळतात.

भूक होईल कंट्रोल

दही पौष्टिक असण्यासोबतच याने भूकही कंट्रोल करण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात खाण्या-पिण्यात जराही चूक झाली तर अनेक समस्या होतात. अशात दही खाल्ल्याने भूक लागत नाही आणि ओव्हरईटिंगही होत नाही.

एलर्जी होईल दूर

उन्हाळ्यात सूज कमी करणाऱ्या गुणांसोबत एलर्जीची लक्षणंही कमी केली जाऊ शकतात. उन्हाळ्यात होणाऱ्या एलर्जीची समस्या दही खाऊन कमी केली जाऊ शकते.

दह्यात काय मिक्स करून वाढेल फायदा

दह्याची टेस्ट आणि त्यातील पोषक मूल्य वाढवण्यासाठी यात काकडी, पदीना, कोथिंबीर, मध, कलिंगड, काळे मिरे पावडर, काळं मीठ, दालचीनी पावडर आणि केळी यासारख्या गोष्टी मिक्स करू शकता.

Web Title: Add these foods in curd or dahi to enhance nutrient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.