गोमेकॉत १८ महिन्यांत

By admin | Published: July 30, 2014 07:24 AM2014-07-30T07:24:16+5:302014-07-30T07:26:43+5:30

पणजी : अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या राज्यात कमी होत नाही. उलट ती वाढत आहे. गेल्या अठरा महिन्यांत ८५ अमली पदार्र्थ

Gomekot in 18 months | गोमेकॉत १८ महिन्यांत

गोमेकॉत १८ महिन्यांत

Next

पणजी : अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या राज्यात कमी होत नाही. उलट ती वाढत आहे. गेल्या अठरा महिन्यांत ८५ अमली पदार्र्थ नशाबाजांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचारांसाठी नेण्यात आल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे.
एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत ८५ अमली पदार्थ नशाबाजांची गोमेकॉत नोंदणी करण्यात आली. अमली पदार्र्थ नशाबाजांवर उपचार करण्यासाठी गोमेकॉत कोणताही स्वतंत्र विभाग नाही. त्यामुळे गोमेकॉत अशा प्रकारचे रुग्ण आणले गेल्यानंतर त्यांची नोंदणी करून मग त्यांना उपचारांसाठी मानसोपचार इस्पितळात दाखल केले जाते. सरासरी दोन ते चार आठवड्यांमध्ये अशा रुग्णांवर उपचार केले जातात. उपचार कधी पूर्ण होतात याचा निश्चित कालावधी स्पष्ट करता येत नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एका प्रश्नाच्या अनुषंगाने लेखी स्वरूपात विधानसभेत सादर केली आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Gomekot in 18 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.