आदिवासी तरूणावर पोलिसांनी झाडल्या गोळ्या

By admin | Published: September 25, 2015 01:59 AM2015-09-25T01:59:38+5:302015-09-25T01:59:38+5:30

एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील रहिवासी बिरसू राजू आत्राम या २७ वर्षीय तरूणावर पेरमिली येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने गोळ्या झाडल्या.

Police firing on tribal youth | आदिवासी तरूणावर पोलिसांनी झाडल्या गोळ्या

आदिवासी तरूणावर पोलिसांनी झाडल्या गोळ्या

Next

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : पेरमिली पोलीस ठाण्यांतर्गत घटना; चौकशीची मागणी
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील रहिवासी बिरसू राजू आत्राम या २७ वर्षीय तरूणावर पेरमिली येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाने गोळ्या झाडल्या. यात उजव्या हाताच्या मनगटाला गंभीररित्या इजा झाली आहे. संबंधित केंद्रीय पोलीस दलाचे अधिकारी व जवान तसेच पेरमिली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसू राजू आत्राम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० सप्टेंबर रोजी रविवारी पेरमिलीवरून चंद्रा येथे आपले मित्र मिथून लक्ष्मण मडावी यांना घरी सोडून देण्यासाठी रात्री ८.३० वाजता मोटार सायकलने जात असताना चंद्रा ते गट्टेपल्ली जंगलात रस्त्यात रात्रीच्या अंधारात लपून बसलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी आपल्या आवाज दिला. तेव्हा आपण थांबलो व मागे वळून पाहिले, तेव्हा सडकेच्या कडेला झुडूपातून दोन बंदुकधारी जवान जवळ येताना दिसले. त्यांनी माझ्याजवळ उभे राहून कोणतीही विचारपूस न करता बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. त्यातील काही गोळ्या माझ्या उजव्या हाताच्या मनगटला लागल्या व बोटांना जखम झाली आहे. गोळीच्या आवाजामुळे काही वेळ आपले कान बधिर झाले होते. त्यानंतर आपल्या उजव्या हातातून रक्त वाहत असल्याचे पाहून जवळच्या औषधीपैकी एक मलम लावायला दिला. मात्र ओळख दिली नाही. दोन किमी अंतर जखमी अवस्थेत पायी चालायला लावले. त्यानंतर आपल्याला पेरमिली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथील आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले व रात्री येथेच झोप म्हणून सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी मला कुठल्याही रूग्णालयात नेण्यात आले नाही. सकाळी ९ वाजता पेरमिली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी मला वारंवार विचारणा करू लागले. तू घरी जाऊन कुटुंबियांना काय सांगशील, अशी त्यांनी विचारणा केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला लाच देण्याची आमिषही दाखविली व आलापल्ली येथून मित्रासोबत दारू पिऊन येत असताना मोटारसायकलला अपघात झाला व आपण जखमी झालो, असे सांग असे ते म्हणाले. तुझ्याजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. तुझ्या गाडीचे ब्रेक फेल आहे व तू घटनेच्या ठिकाणी एकटाच होता. सीआरपीएफचे १०० जवान होते. तुझ्यावर कोणतीही बनावट केस दाखल करू शकतो, असेही ते म्हणाले, असे आत्राम याने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे व आपल्या हातावर १० हजार रूपये ठेवले व २१ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता घरी जाण्यास सांगितले. आपल्यावर सीआरपीएफ जवानाकडून झालेल्या गोळीबार प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पेरमिली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बिरसू आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उपपोलीस स्टेशन पेरमिली अंतर्गत २० सप्टेंबर रात्री चंद्रा-गट्टेपल्ली मार्गावर पेट्रोलिंग चालू असताना रात्री ८ वाजता बिरसू राजू आत्राम रा. गट्टेपल्ली हा व्यक्ती सूसाट वेगाने दुचाकीने येत होता. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो थांबला नाही. घाबरून खाली कोसळला व हाताला मारला लागला. तो दारूच्या नशेत होता. त्याला आमच्या पोलीस पार्टीकडून मदतीच्या आधारे पेरमिली आरोग्य केंद्रात आणून प्रथमोपचार करून घरी पोहोचविण्यात आले. त्याच्यावर गोळीबार वगैरे कोणत्याही प्रकारची घटना झाली नाही.
- चांगदेव कोळेकर, ठाणेदार,
उपपोलीस ठाणे पेरमिली.

Web Title: Police firing on tribal youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.