यशस्वी झालेले चरित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2015 11:41 PM2015-09-04T23:41:06+5:302015-09-05T00:43:32+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. बऱ्याच दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी अशा प्रकारचा चित्रपट बनवून झाला आहे किंवा त्यांची तशी योजना आहे.

Successful Screenplay | यशस्वी झालेले चरित्रपट

यशस्वी झालेले चरित्रपट

googlenewsNext

सध्या बॉलिवूडमध्ये आत्मचरित्रावर आधारित चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. बऱ्याच दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी अशा प्रकारचा चित्रपट बनवून झाला आहे किंवा त्यांची तशी योजना आहे. आत्मचरित्रावर आधारित चित्रपट म्हणजे हमखास यश, असे जणू समीकरणच झाले आहे. ‘मांझी’ने यावर शिक्कामोर्तब केले आहे. नुकतीच ‘मांझी’ची सक्सेस पार्टी मुंबईत पार पडली. यावेळी पार्टीत सक्सेसफूल बायोपिकचीच चर्चा होती. अशाच काही फेमस बायोपिकचा हा आढावा....

नवाजुद्दिनचा अभिनय असलेला मांझी-द माउंटन मेन या चित्रपटाने या मालिकेत आणखी एक यशाचा तुरा रोवला आहे. याआधी डर्टी पिक्चर, पानसिंग तोमर, भाग मिल्खा भाग आणि मेरी कोम या आत्मचरित्रपर चित्रपटांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपटसुद्धा निर्माण झाले आहेत. त्यात दाऊदवर आधारित वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, काही क्र ीडापटूच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि बोस-द फरगॉटन हिरो या सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा समावेश आहे.

मेरी कोम चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आता पाकिस्तानातील भारतीय शेतकरी सरबजीत सिंग याच्यावर चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत, ज्यात ऐश्वर्या रॉय अभिनय करणार आहे. सरबजीत पाकिस्तानात पकडला गेला होता, त्याच्यावर पाकिस्तानने हेरगिरीचे आरोप ठेवून अटक केली होती. लाहोरच्या कारागृहात एप्रिल २०१३ मध्ये काही कैद्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता, काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला होता. सोनाक्षी सिन्हा सुद्धा निर्माता अपूर्व लाखियाच्या हसीना या येऊ घातलेल्या चित्रपटात दाऊदची बहीण हसीना पारकरची भूमिका साकारणार आहे. तिच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची पटकथा उत्कृष्ट आहे आणि ती ही भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे. हसीना पारकर ही दाऊदची मोठी बहीण आहे. तिचे गेल्यावर्षी जुलै महिन्यात निधन झाले होते. १९९१ साली दाऊदचा वैरी असलेल्या अरु ण गवळीच्या सांगण्यावरून काहींनी हसिनाचा पती इस्माईल पारकरची हत्या केली होती, असा आरोप आहे. तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिने दाऊद गॅँगची मुंबईतली धुरा सांभाळून हत्येचा बदला घेतला होता. इम्रान हाश्मीसुद्धा त्याच्या आगामी ‘अझहर’ चित्रपटात भारताचा माजी क्रि केट कर्णधार अझरूद्दीनची भूमिका साकारणार आहे. २००० सालात त्याच्यावर फिक्सिंगचे आरोप झाले होते आणि त्यावर आजन्म बंदीची कारवाई झाली होती. २०१२ साली आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ती बंदी उठवली होती.
निर्माता अनुराग बसूसुद्धा गायक किशोर कुमार यांच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी करत आहेत. रणबीर कपूर या चित्रपटात किशोर कुमार यांची भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूर आणखी एका आत्मचरित्रपर चित्रपटात काम करणार आहे. तो असणार आहे संजय दत्त याच्या जीवनावर. अजूनही काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांना दुसऱ्या अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रिची भूमिका साकारायची आहे. त्यातली एक आहे क्रि ती सानोन. जिला मधुबालाचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारायचे आहे.

Web Title: Successful Screenplay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.