शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:55 AM2024-05-06T08:55:28+5:302024-05-06T08:55:47+5:30

शरद पवारांची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहित शरद पवारांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. (sharad pawar, hemant dhome)

Sharad Pawar health update director hemant dhome emotional post viral | शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."

शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडल्याने सर्वांनाच चिंता वाटली. बारामती लोकसभा मतदारसंघात रविवारी दिवसभर त्यांच्या सभा होत्या.  परंतु बारामतीतील सभेतच त्यांचा घसा बसला होता. घसा बसल्याचा उल्लेख भाषणात करत त्यांनी अवघ्या सात मिनिटांतच भाषण आटोपले होते. त्यामुळे शरद पवार यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. मराठमोळा अभिनेता - दिग्दर्शक हेमंत ढोमेने शरद पवारांना बरं वाटावं म्हणून मोजक्या शब्दात त्याची काळजी व्यक्त केली.

हेमंत ढोमेची पोस्ट

शदर पवार यांचा फोटो पोस्ट करत हेमंत ढोमेने लिहिलंय की.., "आदरणीय साहेब… आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो… " हेमंतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून तळमळ व्यक्त केलीय. 

बारामतीच्या सभेत शरद पवारांचं भाषण

"आज सर्वत्र पाणी,शेती,बेकारीचा प्रश्न आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर होताना दिसून येत नाही.यासाठी वेगळा निकाल हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे," असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद  पवार यांनी व्यक्त केलं आहे. बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान आज सोमवारी शरद पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Web Title: Sharad Pawar health update director hemant dhome emotional post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.