पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 01:31 PM2017-07-15T13:31:02+5:302017-07-15T13:31:02+5:30

त्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे.पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे.

Avoid these 5 places in Uttarakhand during the rainy season. Although the beauty of nature is full of danger, the risk to life is the same! | पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

पावसाळ्यात उत्तराखंडमधील ही 5 ठिकाणं आवर्जून टाळा. निसर्गसौंदर्य भरभरून असलं तरी जीवाला धोकाही तितकाच आहे!

 

- अमृता कदम

देवभूमी उत्तराखंडला तीर्थक्षेत्रं आणि निसर्गसौंदर्य या दोन्ही गोष्टींमुळे कायमच पर्यटकांची गर्दी असते. पण उत्तराखंडला भेट द्यायची असेल तर योग्य सीझन कोणता हेदेखील माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर इथल्या लहरी निसर्गामुळे पर्यटनाच्या आनंदापेक्षा आपत्तीला तोंड द्यावं लागू शकतं. विशेषत: पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी फिरायला जाणं हे धोकादायक आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाकडून इथल्या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीसंदर्भात काही विशेष सूचना जाहीर केल्या जात नाहीत. आणि प्रत्यक्ष उत्तराखंडला जाऊन आलेल्या लोकांचे अनुभव आपण गांभीर्याने घेतोच असं नाही.

जास्त जोराचा पाऊस झाला तर नैनितालहून बाहेर पडण्याचे महत्त्वाचे मार्ग बंद होतात. नैनिताल-कलदुंगी आणि नैनिताल बायपास पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. प्रचंड वेगानं कोसळणारे धबधबे आणि उतारावरु न कोसळणाऱ्या दरडींमुळे या मार्गांवर अडथळे निर्माण होतात. उत्तराखंडची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून असल्यानं आणि चार वर्षांपूर्वी केदारनाथ प्रलयानंतर अधिकारी आणि रेस्क्यू टीम ही कायमच दक्ष असली , स्वत: मुख्यमंत्री पर्यटनस्थळांच्या सुरक्षेसंदर्भाचा आढावा घेत असले तरी पावसाळ्यात उत्तराखंडमधल्या काही ठिकाणांना भेटी देणं टाळणंच इष्ट!

चोप्टा

निसर्गसौंदर्य आणि हिमालयाचं होणारं दर्शन यांमुळे पर्यटक चोप्टाला आवर्जून भेट देतात. मात्र चोप्टाला जाणारा मार्ग हा उकीमठवरून जातो आणि पावसाळ्यामध्ये इथे भूस्खलनाचा धोका असतो.

 

धरचुला

हे गाव भारत-नेपाळ बॉर्डरला अगदी लागून आहे. पिठोरागढ जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांसाठी जणू नंदनवनच आहे. पण मान्सूनमध्ये इथे भेट देणं हे जाणूनबुजून धोका पत्करण्यासारखं आहे. कारण पावसाळ्यात पिठोरागढ राष्ट्रीय महामार्ग वारंवार बंद होतो. शिवाय वाहनांवर मातीचे ढिगारे किंवा कड्यांचे अवशेष कोसळ्याचीही शक्यता असते.

 

पावसाळ्यात साहस टाळाच!

 

पावसाळ्यात हटके डेस्टिनेशन निवडून ट्रीप प्लॅन करण्याचा कल आजकाल वाढत आहे. विशेषत: तरूणाईला साहसाला आव्हान देणाऱ्या ठिकाणांना भेट देण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. मात्र आपल्या आनंदाबरोबरच स्वत:ची सुरक्षितताही महत्त्वाची असते हे लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणूनच पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करताना कुठे जायचं हे नक्की करण्याबरोबरच कुठे जायचं नाही हे ठरवणंही अत्यंत आवश्यक आहे. या मान्सूनला तुम्ही वेगळ्या ठिकाणी जायचं म्हणून उत्तराखंडची निवड करत असाल तर आधी इथल्या ठिकाणांची, भौगोलिक परिस्थितीची आणि हवामानाची माहिती घेऊनच ठिकाणं निश्चित करा.

Web Title: Avoid these 5 places in Uttarakhand during the rainy season. Although the beauty of nature is full of danger, the risk to life is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.