आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 02:34 PM2024-03-26T14:34:55+5:302024-03-26T14:35:40+5:30

अवघ्या दीड तासात कपडे बदलून आला अन् त्याच घरात पुन्हा केली चोरी.

Punjab Jalandhar Video: thief dodged jalandhar police and ran away, after an hour and a half he rob same house | आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी

आधी पोलिसांना चकवा देऊन काढला पळ, दीड तासानंतर त्याच घरात पुन्हा केली चोरी

Punjab Jalandhar Video: पंजाबच्या जालंधरमधून चोरीची विचित्र घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याने चार पोलिसांना चकवा देत पोबोरा केला. धक्कादायक बाब म्हणजे, दीड तासानंतर तोच चोरटा कपडे बदलून परत त्याच घरात चोरी करण्यासाठी आणि चोरी करुन पळुनही गेला. ही संपूर्ण घटना शेजारच्या घरात  लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील पॉश भागांपैकी एक असलेल्या श्री गुरु गोविंद सिंग एव्हेन्यू येथील एका घरात चोरटा भरदिवसा शिरला. घरात चोर असल्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली आणि पोलिसांचे पथकही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या चोरट्याला सरेंडर करण्यास सांगितले, पण त्याने तीन ते चार पोलिसांसोरून पळ काढला. यावेळी एक पोलिसाने त्याला पकडण्याच्या प्रयत्न केला, पण ते रस्त्यावर पडले. यानंतर पोलीस तासभर घटनास्थळी थांबून तेथून निघून गेले.

पुन्हा त्याच घरात चोरी केली
पोलीस गेल्यानंतर दीड तासाने तोच चोर कपडे बदलून पुन्हा त्याच घरात शिरला आणि सामान घेऊन पळाला. पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याची आणि परत येऊन चोरी करण्याची संपूर्ण घटना शेजारच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चोरट्याने घरातून कोणत्या वस्तू चोरल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्या घरात फक्त वृद्ध लोक राहतात, तर त्यांची मुले राज्याबाहेर काम करतात. याप्रकरणी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी त्या भागातील नागरिकांनी केली आहे.

 

Web Title: Punjab Jalandhar Video: thief dodged jalandhar police and ran away, after an hour and a half he rob same house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.