'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video 

दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) ची इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 07:57 PM2024-04-19T19:57:01+5:302024-04-19T19:57:22+5:30

whatsapp join usJoin us
'Your wife': RCB batter Virat Kohli's epic response to a query catches Dinesh Karthik off-guard completely, Video  | 'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video 

'तुझी बायको'! दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर विराट कोहलीनं का दिलं असं उत्तर? Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) ची इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सातत्याने धावा करत आहे. यष्टीरक्षक फलंदाजाने आतापर्यंत ६ इनिंग्जमध्ये ७४.३३ च्या सरासरीने २२६ धावा केल्या आहेत. या दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकने पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ पूर्वी निवड समितीचे लक्ष वेधले आहे. तो  नोव्हेंबर २०२२ पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. पण, आयपीएल गाजवतोय, परंतु आज विराट कोहलीसोबतच्या गप्पांमध्ये त्याच्यावर क्लिन बोल्ड होण्याची वेळ आली.


त्याने RCB च्या खेळाडूंची मुलाखत घेतली आणि यात विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, रजत पाटीदार आणि मोहम्मद सिराज हे व्हिडीओत दिसत आहेत. कोहलीने पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात कार्तिकच्या पत्नीचा उल्लेख केला आणि DK स्तब्ध झाला. दिनेश कार्तिकने प्रश्न विचारला की, क्रिकेटपटूसोडून मला कोणता खेळाडू आवडतो? यावर विराटने असं उत्तर दिलं की त्याला धक्काच बसला. विराट म्हणाला, तुझी बायको. 


 

कार्तिकने २०१५ मध्ये स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले. आयपीएल २०२४ मध्ये RCB ला ७ सामन्यांत ६ पराभव पत्करावे लागले आहेत.  
 

Web Title: 'Your wife': RCB batter Virat Kohli's epic response to a query catches Dinesh Karthik off-guard completely, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.