चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Published: March 6, 2017 12:49 AM2017-03-06T00:49:50+5:302017-03-06T00:51:57+5:30

वाशी : वाशी शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव (को़) येथे शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला़

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

googlenewsNext

वाशी : वाशी शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव (को़) येथे शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ वाशी शहरातील एका घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ तर पिंपळगाव (को़) येथे एक पानटपरी फोडून चोरट्यांनी मुद्देमाल पळविला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील दिनेश चंद्रकांत जोशी हे पोलीस स्टेशन रोडवरील टकले यांच्या घरी किरायाने राहतात़ रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली आहे. ऐवज किती चोरीस गेला हे मात्र समजू शकले नाही़ पोलीस दलातच नोकरीस असलेले हवालदार बी़बी़जगताप हे शहरातील पारडी रोडवर परिसरात राहतात़ रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न केला़ मात्र, घरातील नागरिक जागे झाल्याने आणि त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी धूम ठोकली़
वाशी तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथील समाधान गोकुळ कोठावळे यांची पानटपरी रविवारी पहाटे चोरट्यांनी फोडली़ पानटपरीतील तीन हजाराच्या आसपास मुद्देमाल लंपास केला आहे़ कोठावळे यांनी पोलिसात तक्रार दिली असून तपास पोलीस नाईक महादेव राऊत करत आहेत़ वाशी येथील चोरीचा तपास हवालदार भाऊसाहेब बोबडे हे करत आहेत. दरम्यान, ठाण्याच्या हद्दीतील तीन गावात चोऱ्यांच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.