निवासी शाळेत १४ वर्षीय मूक मुलीवर लैंगिक अत्याचार! वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 07:39 PM2024-04-27T19:39:34+5:302024-04-27T19:40:13+5:30

चंद्रपूर : शहरातील एका निवासी मूकबधिर विद्यालयात १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली ...

A 14-year-old girl was sexually assaulted in a residential school! Hostel Superintendent, President, Secretary along with Principal arrested | निवासी शाळेत १४ वर्षीय मूक मुलीवर लैंगिक अत्याचार! वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापक अटकेत

निवासी शाळेत १४ वर्षीय मूक मुलीवर लैंगिक अत्याचार! वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापक अटकेत

चंद्रपूर : शहरातील एका निवासी मूकबधिर विद्यालयात १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली आहे. विद्यालयातीलच तीन महिला शिक्षिका तसेच एक शिक्षकाने शहर पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दिली. त्या आधारावर शहर पोलिसांनी कलम ३५४, ३५४ बी, १०९, पोक़्सो कलम १०, १७, २१, ८, ९ एफ, ९ अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा १९८९ चे कलम ३ (१) (डब्ल्यू) (१), ३ (१) (डब्ल्यू) (२), ३ (२) (वीए) अंतर्गत वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिव मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

संस्थाध्यक्ष अनंत विश्वासराव लहामगे, सचिव जयेश गोविंदराव वाऱ्हाडे, मुख्याध्यापक कालिदास लटारी बल्की, वसतिगृह अधीक्षक अजय एस. वैरागडे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

२३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं ७:३० ते ८ वाजेच्या दरम्यान वसतिगृह प्रमुख अजय वैरागडे याने वसतिगृहात एकटी असलेल्या मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या चर्चेवरून शिक्षिकांना घटनेची माहिती झाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. मात्र कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान, २६ एप्रिल रोजी विद्यालयातील तीन शिक्षिका, एक शिक्षक तसेच पीडित मुलीच्या तक्रारीवरून वसतिगृह अधीक्षक तसेच घटनेचे दुर्लक्ष केल्याने मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य, सचिव व संस्था अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पुुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

एकाला पोलिस, तर तिघांना न्यायालयीन कोठडी

गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी शुक्रवारी वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वसतिगृह अधीक्षक अजय वैरागडे यास दोन दिवसांची पोलिस कोठडी, तर संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.

Web Title: A 14-year-old girl was sexually assaulted in a residential school! Hostel Superintendent, President, Secretary along with Principal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.