lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींच्या 'या' कंपनीला 'अच्छे दिन', गुंतवणूकदारांकडून जोरदार शेअर्स खरेदी, सलग अपर सर्किट

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीला 'अच्छे दिन', गुंतवणूकदारांकडून जोरदार शेअर्स खरेदी, सलग अपर सर्किट

शेअर्सला सलग चौथ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. कंपनीबाबतच्या सकारात्मक वृत्तामुळे ही वाढ दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 02:33 PM2024-03-26T14:33:21+5:302024-03-26T14:34:52+5:30

शेअर्सला सलग चौथ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. कंपनीबाबतच्या सकारात्मक वृत्तामुळे ही वाढ दिसून आली आहे.

reliance Anil Ambani s reliance power share investors buying stocks consecutive upper circuit share market | अनिल अंबानींच्या 'या' कंपनीला 'अच्छे दिन', गुंतवणूकदारांकडून जोरदार शेअर्स खरेदी, सलग अपर सर्किट

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीला 'अच्छे दिन', गुंतवणूकदारांकडून जोरदार शेअर्स खरेदी, सलग अपर सर्किट

Reliance Power Share Price Today : अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. मंगळवारी, 26 मार्च रोजी रिलायन्स पॉवरचा शेअर 5% वाढून 27.58 रुपयांवर पोहोचला. रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power) शेअर्सला सलग चौथ्या दिवशी अपर सर्किट लागलं आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ही वाढ 3 बँकांच्या कर्जाची परतफेड आणि JSW रिन्युएबल एनर्जीसोबत झालेल्या करारामुळे झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 2300 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
 

जेएसडब्ल्यूसोबत करार
 

जिंदाल समूहाची कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीनं अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या विंड एनर्जी प्रोजेक्टचं अधिग्रहण केलं आहे. खरं तर, जेएसडब्ल्यू एनर्जीचं युनिट जेएसडब्ल्यू रिन्युएबल एनर्जीनं रिलायन्स पॉवरचा महाराष्ट्रातील 45 मेगावॅटचा विंड एनर्जी प्रोजेक्ट 132 कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी करार केला आहे. जेएसडब्ल्यू रिन्युएबल एनर्जी (कोटेड) लिमिटेड ही JSW निओ एनर्जी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. हा करार 21 मे 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
 

कर्जमुक्त होण्यावर फोकस
 

रिलायन्स पॉवरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रीतून मिळालेले पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचं रिलायन्स पॉवरचं उद्दिष्ट आहे. 31 मार्च 2023 पर्यंत रिलायन्स पॉवरचं एकूण कर्ज सुमारे 700 कोटी रुपये होतं. रिलायन्स पॉवर बँकांच्या थकीत कर्जाची परतफेड करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी डीबीएस बँक,आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेसोबतचं कर्ज फेडलं आहे.
 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: reliance Anil Ambani s reliance power share investors buying stocks consecutive upper circuit share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.