lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > टॅब देणे बंद करण्याच्या घोषणेचे स्वागत

टॅब देणे बंद करण्याच्या घोषणेचे स्वागत

पणजी : राज्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना बंद करणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी जाहिर केल्यानंतर त्याबाबत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांमध्ये स्वागताच्या प्रतिक्रिया आहेत.

By admin | Published: December 23, 2014 12:04 AM2014-12-23T00:04:06+5:302014-12-23T00:04:06+5:30

पणजी : राज्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना बंद करणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी जाहिर केल्यानंतर त्याबाबत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांमध्ये स्वागताच्या प्रतिक्रिया आहेत.

Welcome to announce the discontinuance of tabs | टॅब देणे बंद करण्याच्या घोषणेचे स्वागत

टॅब देणे बंद करण्याच्या घोषणेचे स्वागत

जी : राज्यातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना बंद करणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी जाहिर केल्यानंतर त्याबाबत विद्यार्थी, पालक व अन्य घटकांमध्ये स्वागताच्या प्रतिक्रिया आहेत.
गेल्यावर्षी मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विद्यार्थ्यांना टॅब देण्याची पद्धत सुरु केली होती मात्र निकृष्ट दर्जाचे टॅब आपल्याला मिळाले अशी अनेक विद्यार्थ्यांची भावना आहे. बहुतेक टॅब नादुरुस्त बनले असून त्याचा व शिक्षणाचा काही संबंधच येईनासा झाला आहे. कोट्यावधी रुपये सरकारने टॅब वितरणावर खर्च केले. शैक्षणिक अभ्यासकक्रम टॅबशी जोडला जाईल असे सरकारने प्रारंभी जाहिर केले होते, पण तसे काही घडले नाही. मुले टॅबचा वापर फक्त खेळण्यासाठी करतात. अभ्यासाकडे त्यामुळे दुर्लक्ष होते असे अनेक पालक सांगत आहेत.
एकदा नादुरुस्त बनलेला टॅब पुन्हा दुरुस्त करुन घेणे खेड्यातील पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही कारण टॅब मोफतपणे दुरुस्त करुन दिला जाईल, हे आश्वासनही सेवा देणार्‍या कंपन्यांकडून पाळले जात नाही.
याविषयी लोकमतने काही पालक, विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. (जोड बातमी आहे..

Web Title: Welcome to announce the discontinuance of tabs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.