lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात तेजीचा बोलबाला

शेअर बाजारात तेजीचा बोलबाला

मुंबई शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशीही तेजीचा बोलबाला राहिला. तेजी विक्रम मोडीत काढणारे हे सलग तिसरे सत्र होय.

By admin | Published: August 28, 2014 02:59 AM2014-08-28T02:59:37+5:302014-08-28T02:59:37+5:30

मुंबई शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशीही तेजीचा बोलबाला राहिला. तेजी विक्रम मोडीत काढणारे हे सलग तिसरे सत्र होय.

Stock market swiftly swung | शेअर बाजारात तेजीचा बोलबाला

शेअर बाजारात तेजीचा बोलबाला

मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आजही तेजीचा विक्रम नोंदविला. ११७ अंकांनी उसळी घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,५६० वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३१.३० अंकांनी झेप घेत दिवसअखेर ७,९३६.०५ वर
स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशीही तेजीचा बोलबाला राहिला. तेजी विक्रम मोडीत काढणारे हे सलग तिसरे सत्र होय.
युरो क्षेत्रातील नवीन प्रोत्साहन, आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरण आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेची चाल सुधारल्याने बाजाराला चांगलीच उभारी मिळाली. याशिवाय वायदे करार निकाली काढण्याची मुदत संपण्याआधीच व्यावसायिक घडामोडींना बहर आला. तसेच संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के करण्याचा निर्णय अधिसूचित केल्याने या क्षेत्रातील शेअर्स २० टक्क्यांनी वधारले. गेल्या पाच दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २४६ अंकांनी वाढला.
हे शेअर्स राहिले फायद्यात
बीएसई-३० पैकी २१ कंपन्यांचे शेअर्स नफ्यात राहिले. ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, बजाज आॅटो, डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स वधारले, तर सेसा स्टरलाईट, एनटीपीसी, भेलचे शेअर्स घसरले.
हाँगकाँग वगळता आशियाई बाजारात तेजी दरवळेल. तथापि, युरोपीय बाजारात संमिश्र वातावरण होते.

Web Title: Stock market swiftly swung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.