lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आगामी आढाव्यात रिझर्व्ह बँक करणार प्रमुख दर कपात!

आगामी आढाव्यात रिझर्व्ह बँक करणार प्रमुख दर कपात!

पुढल्या वर्षी फेब्रुवारीत पतधोरणाचा आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख दरात ०.२५ टक्के घट करण्याची शक्यता आहे,

By admin | Published: December 26, 2014 01:13 AM2014-12-26T01:13:42+5:302014-12-26T01:13:42+5:30

पुढल्या वर्षी फेब्रुवारीत पतधोरणाचा आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख दरात ०.२५ टक्के घट करण्याची शक्यता आहे,

RBI cuts key rates in next review | आगामी आढाव्यात रिझर्व्ह बँक करणार प्रमुख दर कपात!

आगामी आढाव्यात रिझर्व्ह बँक करणार प्रमुख दर कपात!

नवी दिल्ली : पुढल्या वर्षी फेब्रुवारीत पतधोरणाचा आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख दरात ०.२५ टक्के घट करण्याची शक्यता आहे, असा अंदाज बँक आॅफ अमेरिका मेरील लिंचने व्यक्त केला आहे.
जानेवारी २०१६ पर्यंत चलन फुगवटा ६ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्यही रिझर्व्ह बँक साध्य करू शकते. जानेवारी २०१५ मध्ये ८ टक्के आणि जानेवारी २०१६ साठी ६ टक्के किरकोळ महागाईचे उद्दिष्टही रिझर्व्ह बँकेला साध्य करता येईल, असे मत बँक आॅफ अमेरिका मेरील लिंचने अहवालात व्यक्त केले आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन ३ फेब्रुवारी रोजी प्रमुख धोरणात्मक दरात ०.२५ टक्के कपात करतील, असे वाटते. जानेवारीत ग्राहक मूल्यांक निर्देशांक आधारित महागाई ६.२ टक्के असेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६२ ते ६३ रुपयांदरम्यान राखण्यासाठी ५० कोटी ते एक अब्ज डॉलर बाजारात विक्रीस काढले जाण्याची शक्यता आहे, असेही यात म्हटले आहे.

Web Title: RBI cuts key rates in next review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.