lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदर कपातीसाठी संधी शोधत आहोत

व्याजदर कपातीसाठी संधी शोधत आहोत

चलनवाढ अपेक्षेपेक्षा खाली आली असून, व्याजदरात कपात करण्यासाठी काही संधी आहे का यासाठी घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे रिझर्व्ह बँकेचे

By admin | Published: August 30, 2015 09:59 PM2015-08-30T21:59:12+5:302015-08-30T21:59:12+5:30

चलनवाढ अपेक्षेपेक्षा खाली आली असून, व्याजदरात कपात करण्यासाठी काही संधी आहे का यासाठी घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे रिझर्व्ह बँकेचे

Looking for opportunities for interest rates deducted | व्याजदर कपातीसाठी संधी शोधत आहोत

व्याजदर कपातीसाठी संधी शोधत आहोत

वॉशिंग्टन : चलनवाढ अपेक्षेपेक्षा खाली आली असून, व्याजदरात कपात करण्यासाठी काही संधी आहे का यासाठी घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले.
सामावून घेतले जाण्याच्या टप्प्यावर आम्ही असून, व्याजदरासाठी किती जागा आहे, हे आम्ही बघत आहोत, असे सांगून राजन म्हणाले की, ‘रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण हे सामावून घेणारे बनले आहे व बँकेने यावर्षी व्याजदरात तीन वेळा कपात केली आहे व अजूनही आम्ही सामावून घेण्याच्या परिस्थितीत आहोत.’
कान्सास सिटी फेडरल रिझर्व्हने आयोजित केलेल्या आर्थिक चर्चासत्रात ते बोलत होते.
चलनवाढ नियंत्रणात आली आहे म्हणजे ती रिझर्व्ह बँकेच्या आवाक्यात आली आहे का, असे विचारता त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. बळकट अर्थव्यवस्थांकडेच भांडवल आकर्षित होत असते. भारतात ते तुम्हाला बघायला मिळते, असे राजन म्हणाले. गेल्या काही महिन्यांमध्ये भांडवलाचा ओघ बाहेर गेल्याचा फटका उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना बसला आहे. आम्हालाही तो काहीसा बसला आहे; परंतु काळजी करण्यासारखा नाही. चलनवाढीकडे आमचे लक्ष असून, ती कमी होण्यास मान्सूनने हातभार लावला आहे. पर्यायाने वस्तूंचे भाव खाली आले; परंतु चलन विनिमयातील नुकसानीमुळे त्यालाही झळ बसली, असे रघुराम राजन म्हणाले. राजकीय अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारे असामान्य नाही. ते एक वास्तव आहे. त्याचा आम्ही स्वीकार करायला हवा. धोरणात्मक विश्लेषणात या व्यवस्थेला सहभागी करून घ्यायला हवे. महागाई कोणत्या पातळीवर असायला हवी, हे इतिहास आणि राजकीय अर्थव्यवस्थाच निश्चित करीत असते.

Web Title: Looking for opportunities for interest rates deducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.