lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महत्त्वाचे - राष्ट्रवादी

महत्त्वाचे - राष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या जाहीरनामा

By admin | Published: June 19, 2014 10:31 PM2014-06-19T22:31:11+5:302014-06-19T22:31:11+5:30

राष्ट्रवादीच्या जाहीरनामा

Important - Nationalist | महत्त्वाचे - राष्ट्रवादी

महत्त्वाचे - राष्ट्रवादी

ष्ट्रवादीच्या जाहीरनामा
समितीत प्रदेशाध्यक्षच नाहीत
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ेस्थापन केलेल्या जाहीरनामा समितीत प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा समावेश नाही.
पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्र परिषदेत सांगितले की, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील समितीचे अध्यक्ष असतील. गृहमंत्री आर. आर. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, खा. सुप्रिया सुळे, सुधीर भोंगळे सदस्य असतील. प्रदेशाध्यक्ष जाधव यांचा समितीत समावेश का नाही, त्यांना बदलणार का, या प्रश्नात ते म्हणाले की, पक्षात नाही पण माध्यमांमध्ये तशी चर्चा आहे. पक्षात प्रत्येकाला वेगवेगळे जबाबदारी दिलेली असते.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा वेगवेगळा जाहीरनामा राहणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षाचा जाहीरनामा राहील आणि शिवाय आघाडीचा संयुक्त जाहीरनामादेखील असेल.
काँग्रेससोबत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जागा वाढवून हव्या आहेत, असे सांगून नवाब मलिक म्हणाले की, आमचे नेते शरद पवार दिल्लीत काँग्रेसश्रेष्ठींशी या बाबत लवकरच चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतील. राष्ट्रवादी स्वबळावर लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Important - Nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.