lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अटलजी हे सुशासनाचेच प्रतीक (भाग १)

अटलजी हे सुशासनाचेच प्रतीक (भाग १)

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलजींच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन

By admin | Published: December 25, 2014 10:41 PM2014-12-25T22:41:11+5:302014-12-25T22:41:11+5:30

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलजींच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन

Atalji is the symbol of governance (Part 1) | अटलजी हे सुशासनाचेच प्रतीक (भाग १)

अटलजी हे सुशासनाचेच प्रतीक (भाग १)

-
ेंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलजींच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन
नागपूर : विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले तर केवळ विकासाचा उपयोग होत नाही. अटलजींनी विकासाचा मंत्र दिला पण विकासाचा उपयोग सामान्य नागरिकांना व्हावा म्हणून योग्य सुशासन असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या विचारधारेवरच आमचे काम सुरू आहे. अटलजी हे सुशासनाचेच सुयोग्य प्रतीक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले.
भाजपतर्फे डॉ. नारायण खेकाळे लिखित आणि लाखे प्रकाशनाद्वारे प्रकाशित अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रग्रंथाचे लोकार्पण डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, डॉ. राजीव पोतदार, लेखक डॉ. नारायण आणि सुजाता खेकाळे, आ. आशिष देशमुख, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, बळवंतराव ढोबळे, आ. समीर मेघे, आ. मितेश भांगडिया, कल्पना पांडे, आ. सुधाकर कोहळे, अशोक मानकर, चंद्रकांत लाखे, प्रमोद पेंडके, संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, अटलजींसोबतचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. जनसंघाचे लोक निवडून येत नव्हते आणि अनामत रक्कम जप्त होत होती त्या काळात अटलजींनी केलेल्याा कामामुळेच आज चांगले दिवस आले आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य राष्ट्राला समर्पित होते. भारतरत्न उपाधीने त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या विचारधारेवर विकास आणि सुशासन आणण्याचा प्रयत्न आपण सारेच करू या, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटलजींचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे उलगडणे एका पुस्तकात शक्य नाही. पंतप्रधान असताना त्यांनी राबविलेल्या संकल्पनांचा जगात सन्मान झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांनाही जगभर मान्यता मिळाली. पंतप्रधान सडक योजनेमुळे ३ लाख गावे जोडली गेली. त्यांच्यात सर्वसमावेशकता होती. त्यांच्या या पुस्तकाने नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी लेखकाचे मनोगत त्यांची मुलगी डॉ. अपर्णा गाडे यांनी वाचून दाखविले.

Web Title: Atalji is the symbol of governance (Part 1)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.