सामूहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

By admin | Published: March 28, 2017 01:39 AM2017-03-28T01:39:11+5:302017-03-28T01:39:11+5:30

एसटी महामंडळाचा उपक्रम; गर्दी तेथे एसटी संकल्पना येणार प्रत्यक्षात.

Now it will reach the venue of the mass marriage! | सामूहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

सामूहिक विवाहाच्या ठिकाणीही पोहोचणार आता बस!

Next

अनिल गवई
खामगाव, दि. २७- तोट्यातील 'एसटी'ला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, खामगाव आगाराकडून आता सामूहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणीही थेट एसटीची सेवा देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. 'हात दाखवा, एसटी थांबवा' या उपक्रमाच्याच धर्तीवर '४0 प्रवासी जमवा, एसटी बोलवा' या अभियानाची मुहूर्तमेढ गुढीपाडव्यापासून रोवल्या जाणार असल्याची माहिती आहे.
एसटी महामंडळाच्या दररोज जवळपास १४ हजार ९00 फेर्‍या तोट्यात धावत असून, या फेर्‍यांमुळे वर्षाला २४0 कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ३७ हजार ४१७ खेडेगावांसह शहरी भागातील प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधेचाही समावेश असून,आता अधिक प्रवासी असलेल्या ठिकाणी थेट एसटी पाठविण्याची अंमलबजावणी एसटी महामंडळाकडून केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गर्दी आणि यात्रेच्या ठिकाणी एसटीची विशेष सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खासगी प्रवासी वाहतुकीला बसणार आळा!
४शहरी व ग्रामीण भाग यातील एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी मानली जाते; मात्र राज्यातील ग्रामीण भाग आणि खास करून दुर्गम भागात ह्यबंधनकारकह्ण सेवा देताना एसटी महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. दरम्यान, राज्यातील सुमारे ७ हजार मार्गांना अवैध वाहतुकीचा विळखा आहे. या अवैध वाहतुकीमुळे बाधित झालेल्या मार्गावरील आर्थिक तूट भरून काढण्यासाठीचा एक भाग म्हणून आगामी काळात ह्यगर्दी तेथे एसटीह्ण हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एक कॉल करा, बस मिळवा!
४प्रवासी वाढवा अभियानांतर्गत अधिक प्रवासी असलेल्या ठिकाणी खामगाव आगाराला माहिती दिल्यास, एस टी बसची सुविधा दिली जाणार आहे. जास्त प्रवासी असलेल्या ठिकाणी बससोबतच पर्यायी व्यवस्थाही करून दिली जाणार आहे. यामध्ये अधिक प्रवासी हाच निकष वापरण्यात येणार असल्याने, शटल सर्व्हिसचाही वेळेवर रूट चेंज करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Now it will reach the venue of the mass marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.