बुलडाणा जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 09:49 PM2017-03-27T21:49:30+5:302017-03-27T21:49:30+5:30

जिल्ह्यातील एकूूण ८६८ ग्रामपंचायतींपैकी २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत.

223 Gram Panchayats of Buldhana district have been declared as Health Care | बुलडाणा जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त

बुलडाणा जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त

Next

ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. २७- जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात येत असून, जिल्ह्यातील एकूूण ८६८ ग्रामपंचायतींपैकी २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत.
बुलडाणा जिल्हा १00 टक्के हगणदरीमुक्त करण्यासाठी मार्च २0१८ पर्यंत मुदत आहे. हगणदरीमुक्तीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेंतर्गत ग्रामीण भागात शौचालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात ३00 ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीसाठी हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे २0१५-१६ मध्ये ४६ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील ३00 ग्रामपंचायतींचा उद्दिष्ट्यापैकी २२३ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्यात. आता या योजनेचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी उरला असून, या काळात जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी ६४५ ग्रामपंचायतींचे लक्ष्य राहणार आहे.
वर्षभरात १७७ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २0१५-१६ या वर्षामध्ये ८६८ ग्रामपंचायतींपैकी केवळ ४६ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या होत्या; मात्र मार्च २0१८ पर्यंत १00 टक्के जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याने २0१६-१७ या वर्षात १७७ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत.

Web Title: 223 Gram Panchayats of Buldhana district have been declared as Health Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.